Jobless Positive Side: नोकरी नाही म्हणून टेन्शन आलंय? या तरुणीचा व्हिडीओ एकदा पाहाच

vivek panmand   | CMS
Published : Sep 27, 2026, 03:52 PM IST
photo

सार

nokari karne: नोकरी नसताना मानसिक ताण येतो हे खरंय, पण याच काळात आपल्याला आयुष्याशी लढण्याची ताकद आणि आत्मविश्वास मिळतो, असं अनिशा सांगते.

नोकरी जाणं किंवा खूप प्रयत्न करूनही नोकरी न मिळणं... ही परिस्थिती माणसाला आतून पूर्णपणे तोडून टाकते, नाही का? पण, या नैराश्याच्या काळातही काही चांगल्या गोष्टी लपलेल्या असतात, असं एका तरुणीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. अनिशा अरोरा असं या तरुणीचं नाव असून, तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. नोकरी नसताना मानसिक ताण नक्कीच येतो, पण याच काळात आपला आत्मविश्वास आणि संकटांशी लढण्याची ताकद वाढते, असं ती सांगते.

अनिशाच्या मते, बेरोजगारीमुळे मानसिक ताण वाढतो हे खरंय, पण याच काळात आपल्याला आयुष्याशी दोन हात करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास मिळतो. जेव्हा आपल्याला सतत नकार पचवावे लागतात, तेव्हा एक वेळ अशी येते की अपयशाची भीतीच वाटत नाही. यामुळे करिअरबाबत मनात असलेली भीती कायमची निघून जाते, असं तिने स्पष्ट केलं

.

या कठीण काळात आपण लोकांशी रेफरन्स मागायला, अनोळखी व्यक्तींशी बोलायला आणि कॉफी चॅटसाठी लोकांना भेटायला शिकतो. एरवी सामान्य परिस्थितीत आपण या गोष्टी करायला कचरतो. भविष्यात काय होणार हे माहीत नसतानाही, रोज सकाळी उठून नव्याने प्रयत्न करण्याची जिद्द ही परिस्थितीच आपल्याला शिकवते.

युजर्स काय म्हणाले?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, 'बेरोजगारी खऱ्या अर्थाने आपल्या सहनशीलतेची आणि संयमाची परीक्षा घेते.' दुसऱ्या एकाने म्हटलंय, 'यातला मानसिक ताण हा सर्वात कठीण भाग असतो.' तर आणखी एकाने, 'आजच्या दिवसात मला हेच शब्द ऐकायचे होते,' अशी कमेंट केली आहे.

असं असलं तरी, आयुष्यात असा अनुभव एकदाच आलेला बरा. अशा कठीण प्रसंगातून कोणालाही जावं लागू नये, अशी प्रार्थना करत अनिशाने आपली पोस्ट संपवली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Delhi Factory Fire: दिल्लीच्या हर्ष विहारमध्ये कारखान्याला भीषण आग, जीवितहानी नाही
Tukaram Mundhe | दूध, स्ट्रीट फूड नियमनावर तुकाराम मुंढे | FDA Maharashtra