Rapido Delivery Boy : 'गेट लॉक होतं म्हणून वाचले...'; रॅपिडो डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने तरुणी हादरली

Published : Sep 27, 2026, 09:49 AM IST
Rapido Delivery Boy : 'गेट लॉक होतं म्हणून वाचले...'; रॅपिडो डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने तरुणी हादरली

सार

बंगळुरूमध्ये डिलिव्हरीला उशीर का झाला, असा जाब विचारणाऱ्या महिलेसोबत रॅपिडो डिलिव्हरी बॉयने गैरवर्तन केलं. त्याने थेट गेट तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. रॅपिडो कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने पीडितेने ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

बंगळुरू :  बंगळुरूमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. डिलिव्हरीला उशीर का झाला, असं विचारल्याचा राग आल्याने एका रॅपिडो (Rapido) डिलिव्हरी बॉयने महिलेच्या घराबाहेर येऊन गैरवर्तन केलं. त्याने गेट तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्यावर त्याने घराबाहेर लघवी करत आपली विकृती दाखवून दिली.

सिरीशा नावाच्या बंगळुरूमधील एका महिलेने तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली आहे. तिने आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग सविस्तरपणे मांडला आहे.

सिरीशाच्या ट्विटमध्ये काय आहे?

'रॅपिडो डिलिव्हरी बॉय माझ्या घरी आला आणि त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने गेटवर जोरजोरात मारून ते उघडण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या घराबाहेर लघवी केली,' असा आरोप सिरीशाने केला आहे. तिने आपला थरारक अनुभव सांगताना म्हटलंय, 'तो माणूस ४ तासांपेक्षा जास्त उशिरा आला होता. तो सतत मला शिव्या देत होता आणि अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलत होता. त्याने गेटमधून हात टाकून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मी गेट लॉक केलं होतं, नाहीतर काय झालं असतं याचा विचारही करवत नाही.'

एवढंच नाही, तर त्या व्यक्तीने नंतर सिरीशाला ऑडिओ मेसेज पाठवले. घराबाहेर सांडलेलं पाणी नसून ती आपली लघवीच होती, हे त्याने त्या मेसेजमध्ये कबूल केलं. घटना घडली तेव्हा सिरीशा घरात एकटीच होती. या प्रसंगामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

कंपनीचा निष्काळजीपणा:

या घटनेला २४ तास उलटून गेले तरी रॅपिडो कंपनीच्या कस्टमर सपोर्ट (Rapido Support) टीमकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. 'तुम्ही अनेक तिकीटं तयार केली आहेत,' असं सांगून कंपनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप सिरीशाने व्यक्त केला. ग्राहकांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून कंपनीने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.

बंगळुरू पोलिसांचा तातडीने प्रतिसाद -

सिरीशाने आपल्या पोस्टमध्ये बंगळुरू शहर पोलीस (Bengaluru City Police) आणि पोलीस आयुक्तांना टॅग केलं होतं. या ट्विटची तातडीने दखल घेत बंगळुरू पोलिसांनी घटनेची अधिक माहिती गोळा केली आहे. या विकृत डिलिव्हरी बॉयचा पोलीस कसून शोध घेत असून, लवकरच त्याला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Indian Origin Father: ५ वर्षांच्या लेकीच्या अंत्यसंस्कारासाठी बापाची धडपड, मदतीचं आवाहन
Jantar Mantar Protest: सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन मंजूर