
Woman cut private part : आग्र्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीशी लग्न करण्यास नकार दिल्याने वहिनीने दिराचे गुप्तांग कापले. जखमी व्यक्तीला गंभीर अवस्थेत स्थानिक आग्रा एसएन मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने पीडित तरुणाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्द्वानीच्या अल्ट्राटेक कंपनीत काम करणारा इंजिनिअर योगेश दिवाळीच्या सुट्टीसाठी आग्र्यातील घरी गेला होता. सोमवारी रात्री उशिरा बरहानच्या खेडीयाडू गावात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी योगेशचा मोठा भाऊ राजबहादूरची पत्नी अर्चनाला अटक केली आहे.
अर्चनाची इच्छा होती की योगेशने तिच्या बहिणीशी लग्न करावे, असे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पण योगेश त्यासाठी तयार नव्हता. योगेशने मैनपुरीतील एका मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अर्चना खूप संतापली होती. याच कारणामुळे दिवाळीच्या रात्री तिने योगेशला आपल्या खोलीत बोलावले. तिथेच तिने चाकूने योगेशच्या गुप्तांगावर वार केले.
योगेशचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील इतर सदस्य धावत आले. त्यांनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात रुग्णालयात नेले. या घटनेनंतर योगेशच्या भावाने अर्चना आणि तिच्या मुलांना माहेरी पाठवून दिले. पोलिसांनी तिथे जाऊन अर्चना आणि तिच्या पतीची चौकशी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यापूर्वी योगेश त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला होता, असे गावातील अनेकजण सांगतात. पण तो का गेला होता, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.