पत्नी मोलकरीण नाही, नवऱ्यानेही घरकामात मदत करावी, सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

Published : Mar 22, 2026, 09:09 AM IST
Wife Is Not A Maid Supreme Court Tells Man

सार

Wife Is Not A Maid Supreme Court Tells Man नवऱ्याने घरात स्वयंपाक, स्वच्छता, कपडे धुण्यासारख्या कामांमध्ये बायकोइतकाच समान सहभाग घेतला पाहिजे. कारण त्याने मोलकरणीशी नाही, तर जीवनसाथीसोबत लग्न केलं आहे, असं सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात स्पष्ट केलं आहे.

Wife Is Not A Maid Supreme Court Tells Man : 'नवऱ्याने घरात स्वयंपाक, स्वच्छता, कपडे धुण्यासारख्या कामांमध्ये बायकोइतकाच समान सहभाग घेतला पाहिजे. कारण त्याने मोलकरणीशी नाही, तर जीवनसाथीसोबत लग्न केलं आहे,' अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.

सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

एका व्यक्तीला ट्रायल कोर्टाने घटस्फोट मंजूर केला होता. पत्नी नीट जेवण बनवत नाही आणि आपला छळ करते, असा त्याचा आरोप होता. पण कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय रद्द केला. या निर्णयाविरोधात त्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

सर्व कामांमध्ये पतीने समान सहभाग घ्यावा

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पतीला खडे बोल सुनावले. 'स्वयंपाक, स्वच्छता, कपडे धुणे... अशा सर्व कामांमध्ये पतीने समान सहभाग घेतला पाहिजे. आजचा काळ बदलला आहे. पतीने मोलकरणीशी नाही, तर जीवनसाथीसोबत लग्न केलेलं असतं,' असं कोर्टाने स्पष्ट केलं.

यासोबतच, कोर्टाने दोघांनाही समुपदेशनासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

vivekananda patil | निळं वादळ सरकारला परवडणारं नाही | wamandada kardak | Pune MPSC Protest
vivekanand patil | थेट तुकाराम मुंढे यांना साकडं MPSC ला तुम्हीच या | tukaram munde | Pune MPSC