
सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यावेळी राहुल यांच्यासोबत एक महिला आणि मुलगा फोटोत बसलेला दिसून आला आहे. त्यानंतर भाजपचे मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांना प्रश्न विचारला. यावेळी हे कोण आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांना सोशल मीडियावर विचारण्यात आला.
काँग्रेसनं या फोटोवर उत्तर दिल असून त्यांनी भाजपच्या मंत्र्याला कडक शब्दांमध्ये सुनावले आहे. फोटोतील महिला राहुल गांधी यांच्या मित्राची बायको असून तिच्या शेजारी बसलेला मुलगा तिचा आहे. यावेळी राहुल यांनी त्यांच्या मित्राच्या फॅमिलीसोबत वेळ घालवला आहे. हा फोटो अमेरिकेत काढण्यात आल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
आता कोणत्याही मुद्यावरून राजकारण करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. भाजपच्या टीमने असा प्रश्न विचारल्यामुळं आता काँग्रेसकडून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. राहुल गांधी यांचा व्हायरल झालेला फोटो हा वैयक्तिक सुट्टीतला होता. त्यामुळं आता पुढं जाऊन काय होत हा प्रश्न सर्वांना पडला आहे.