Loksabha Election 2024 : सरपंचपासून थेट लोकसभेचे तिकीट, कोण आहेत भाजपच्या उमेदवार लता वानखेडे?

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात तीन वेळा सरपंच राहिलेल्या लता वानखेडे यांना सागर, मध्य प्रदेश येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. 

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्यप्रदेशमधील 24 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. या सर्वांमध्ये महिला उमेदवार लता वानखेडे यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे.

लता वानखेडे यांना सागर लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्या 3 वेळा सरपंच राहिलेल्या आहेत. पण आता सरपंच नंतर त्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
श्री @mpsudhirgupta जी को लोकसभा मंदसौर, श्री शिवमंगल सिंह तोमर जी को लोकसभा मुरैना, श्री @BharatBjp11 जी को लोकसभा ग्वालियर, श्रीमती @Lata_official जी को लोकसभा सागर, श्री राहुल लोधी जी को लोकसभा दमोह एवं श्रीमती अनीता नागर सिंह चौहान जी को लोकसभा रतलाम से भाजपा प्रत्याशी बनाए…

54 वर्षाच्या असणाऱ्या लता वानखेडे यांचे पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. अर्थशास्त्र, सामाजशास्त्रसोबतच पत्रकारितेत त्यांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात पंचायतीपासून केली. त्यांनी मकरोनिया ग्रामपंचायतीतून 1995 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. येथून जिंकल्यानंतर त्या सलग तीन वेळा सरपंच राहिलेल्या आहेत.

लता यांनी भाजप पक्षात अनेक पदांवर काम केले आहे. वर्तमानानात प्रदेश मंत्री आणि इतर पदांवर त्या कार्यरत आहेत. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्याशिवाय महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1974 रोजी झाला. त्यांचे पती सागर वानखेडे असून त्या राजकीय क्षेत्रात लोकप्रिय महिला नेत्या आहेत.
आणखी वाचा - 
Prime Minister Narendra Modi : पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलांबद्दलची ओढ दिसली, हजारोंच्या गर्दीतून एका चिमुरडीची स्वीकारली भेट
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आसनसोलमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला निर्णय जाहीर
'पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ही विश्वासघाताची हमी', लोकसभेच्या जागेंच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका

Read more Articles on
Share this article