पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 व्या शतकातील Vikasit Bharat ची केली होती भविष्यवाणी, वर्ष 1999 मधील व्हिडीओ व्हायरल (Watch)

Published : Apr 08, 2024, 10:51 AM ISTUpdated : Apr 08, 2024, 11:07 AM IST
Narendra Modi in Saharanpur

सार

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर मोदी आर्काइव्ह नावाच्या अकाउंटवरुन पंतप्रधानांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खरंतर व्हिडीओ वर्ष 1999 मधील आहे.

PM Narendra Modi Video : भाजप (BJP) पक्षाने शनिवारी (6 एप्रिल) 44व्या स्थापना दिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांचाही उत्साह दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षातील नेत्यांनी स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्ष 1999 मधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर मोदी आर्काइव्ह (Modi Archive) नावाच्या हॅण्डलवरून पंतप्रधानांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ वर्ष 1999 मध्ये चेन्नईत (Chennai) भाजप पक्षाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद बैठक झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी भाजपचे महासचिव होते. नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) बोलताना म्हटले होते की, 21वे शतक भारताचे असणार आहे. हीच गोष्ट आज खरी ठरताना दिसून येत आहे.

आज जगातील शक्तीशाली देश भारताशी संबंध जोडू पाहत आहेत. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता युजर्सकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेच.

व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?
व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत की, भाजप 21 व्या वर्षात प्रवेश करत आहेत. आमचा 20 वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे. ज्यावेळी आपण नव्या शतकात प्रवेश करणार असू त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाला संबोधित करत म्हटले होते की, “पुढचे शतक हिंदुस्थानाचे असणार आहे. आमचा उद्देश हाच आहे की, आम्हाला भारताची प्रतिमा सुधरवायची आहे. यामुळे आपण भारतीय जनता पक्षाच्या रूपात, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रूपात, आपण भारतीयांच्या रूपात येणाऱ्या काळात अशा गोष्टींना घेऊन चालायचे आहे ज्याचे स्वप्न पंतप्रधानांनी पाहिले आहे. पुढचे शकत हिंदुस्थानाचे असणार आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे.”

याशिवाय आपण कोणता पाया घातला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. तुम्ही किंवा मी येथे बसून पुढील शतकाचा अजेंडा ठरवू शकत नाहीत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा :

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ठरल्यास राहुल गांधींनी माघार घ्यावी, राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी दिला सल्ला

भाजपमध्ये गेल्यानंतर गौरव वल्लभ यांनी काँग्रेसवर केली टीका, माजी केंद्रीय मंत्र्यांचे पीए पक्ष चालवत असल्याचा केला आरोप

इंडिया आघाडी सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला दावा

PREV

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!