WhatsApp Plus: आता व्हॉट्सॲप फ्री नाही? कोणाला महिन्याला 79 रुपये मोजावे लागणार?

Published : Jun 29, 2026, 09:15 PM IST

WhatsApp Plus: भारतात 'व्हॉट्सॲप प्लस' नावाने एक पेड सबस्क्रिप्शन प्लॅन आला आहे. यासाठी महिन्याला 79 रुपये द्यावे लागतील. मग सामान्य युजर्सचं काय? व्हॉट्सॲप आता खरंच फ्री राहणार नाही का? जाणून घ्या.

PREV
15
व्हॉट्सॲप आता फ्री नाही? खिशाला बसणार का फटका?

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांच्या आयुष्याचा व्हॉट्सॲप एक अविभाज्य भाग बनला आहे. पण आतापर्यंत मोफत वापरलेल्या या ॲपसाठी पैसे मोजण्याची वेळ आली आहे. व्हॉट्सॲपने इतिहासात पहिल्यांदाच भारतात 'व्हॉट्सॲप प्लस' नावाचा पेड सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. यासाठी महिन्याला 79 रुपये मोजावे लागतील.

25
सामान्य युजर्सचं काय? व्हॉट्सॲप फ्री राहणार की नाही?

महिन्याला 79 रुपये ऐकून सामान्य युजर्सना काळजी वाटत आहे. पण चांगली बातमी ही आहे की, रेग्युलर युजर्सना कोणताही फरक पडणार नाही. मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस यांसारखी मुख्य फीचर्स पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहतील. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

35
79 रुपयांत व्हॉट्सॲप प्लसमध्ये काय फीचर्स मिळणार?

79 रुपयांमध्ये व्हॉट्सॲप प्लस युजर्सना 18 नवीन कलर थीम्स, 14 नवीन ॲप आयकॉन, एक्सक्लुझिव्ह रिंगटोन आणि स्टिकर पॅक्स मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, युजर्स आता 3 ऐवजी तब्बल 20 चॅट्स पिन करू शकतील.

45
हे सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं?
हे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी व्हॉट्सॲपच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'Subscriptions' पर्यायावर क्लिक करा. तिथे 'WhatsApp Plus' निवडून गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरद्वारे पेमेंट करा. पेमेंट होताच तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल.
55
मेटा कंपनीचा खरा प्लॅन काय आहे?
व्हॉट्सॲपची पॅरेंट कंपनी मेटाचा प्लॅन मोठा आहे. भारत ही व्हॉट्सॲपसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथील काही टक्के युजर्सनी जरी हा प्लॅन घेतला, तरी कंपनीला मोठी कमाई होईल. भविष्यात प्रीमियम फीचर्स आणण्यासाठी हे एक पहिलं पाऊल मानलं जात आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories