IT Rules: सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किती पैसे ठेवता येतात, हे अनेकांना माहीत नसतं. मोठ्या रोख व्यवहारांमुळे आयकर विभागाचं लक्ष वेधलं जाऊ शकतं. याची मर्यादा नेमकी किती आहे आणि नियम काय आहेत? चला पाहूया.
सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किती पैसे ठेवू शकतो? जास्त रक्कम असेल तर आयकर विभाग कारवाई करेल का? अशी शंका अनेकांना असते. पगारदार व्यक्तींपासून ते व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकजण रोजच्या व्यवहारांसाठी सेव्हिंग्ज अकाउंट वापरतो. पण, यात किती पैसे ठेवता येतात याबद्दल सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात.
25
बँक खात्यावर आयकर विभागाची नजर
खरं तर, कायद्यानुसार तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किती पैसे असावेत यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार कितीही पैसे ठेवू शकता. पण, जर तुम्ही वारंवार मोठ्या रकमा रोख स्वरूपात जमा करत असाल किंवा तुमच्या उत्पन्नाशी व्यवहार जुळत नसतील, तर बँका ही माहिती आयकर विभागाला पाठवू शकतात.
35
पैशांचा स्रोत सांगावा लागेल
अशा परिस्थितीत, आयकर विभाग तुमच्याकडून त्या पैशांचा स्रोत विचारू शकतो. त्यावेळी तुमच्याकडे पगाराची कागदपत्रं, व्यवसायातील उत्पन्नाचा पुरावा, मालमत्ता विक्री, बक्षीस, विमा मॅच्युरिटी किंवा वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचे पुरावे असतील, तर कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे मोठ्या व्यवहारांची सर्व कागदपत्रं जपून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवलेल्या पैशांवर टॅक्स लागत नाही. पण, त्या पैशांवर बँक जे व्याज देते, ते उत्पन्न करपात्र असतं. आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, पात्र व्यक्तींना सेव्हिंग्ज अकाउंटच्या व्याजावर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सूट मिळते. तर, ज्येष्ठ नागरिकांना कलम 80TTB अंतर्गत अतिरिक्त कर सवलत दिली जाते.
55
योग्य कागदपत्रं, नो टॅक्स टेन्शन
त्यामुळे, सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये जास्त पैसे आहेत म्हणजे टॅक्स लागेलच, हा विचार चुकीचा आहे. महत्त्वाचं हे आहे की, तुमचे सर्व व्यवहार कायदेशीर असावेत, तुमच्या उत्पन्नानुसार असावेत आणि त्यांची योग्य कागदपत्रं तुमच्याकडे हवीत. असं केल्यास तुम्ही अनावश्यक कर समस्या सहज टाळू शकता.