Glueing Dating Trend: 'ग्लुइंग' नावाचा नवा ट्रेंड आलाय, Gen-Z अडकतायत यात; कधी सावध व्हायचं?

vivek panmand   | CMS
Published : Oct 20, 2026, 09:55 PM IST
photo

सार

'श्रेकिंग', 'बेन स्टेज', 'ब्रेडक्रंबिंग' नंतर आता डेटिंगच्या जगात 'ग्लुइंग' (Glueing) नावाचा नवा ट्रेंड आलाय. यात भावना नसतात, फक्त शारीरिक आकर्षण असतं. जिथे भावनिक जोड संपलेली असते, पण फक्त शारीरिक जवळीक नात्याला टिकवून ठेवते. यावर मानसोपचारतज्ज्ञ काय सांगतायत?

तुम्ही अशा एखाद्या नात्यात आहात का, जिथे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही, मनातून काही वाटत नाही, भविष्याचं कोणतंही प्लॅनिंग नाही, पण तरीही फक्त शारीरिक आकर्षणामुळे तुम्ही तिथे अडकले आहात? जर असं असेल, तर तुम्ही 'ग्लुइंग'चे (Glueing) शिकार आहात. डेटिंग कोच हेली क्विन (Hayley Quinn) यांच्या मते, ग्लुइंग हे असं नातं आहे जिथे शारीरिक जवळीकच नात्याला जोडून ठेवण्याचं काम करते, अगदी एखाद्या 'ग्लू' (डिंक) सारखं. मन उडालेलं असतं, पण शरीर अडकलेलं असतं.

*असं का होतं? विज्ञान काय सांगतं?*

मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, यामागे आपले हार्मोन्स कारणीभूत असतात. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या जवळ येतो, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन (Oxytocin - बाँडिंग हार्मोन), डोपामाइन (Dopamine), प्रोलॅक्टिन (Prolactin) आणि व्हॅसोप्रेसिन (Vasopressin) यांसारखे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स आपल्याला तात्पुरता आनंद, समाधान आणि भावनिकदृष्ट्या जोडले गेल्याची भावना देतात. त्यामुळे बऱ्याचदा आपला गैरसमज होतो की शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम आहे. पण खरंतर हा सगळा हार्मोन्सचा खेळ असतो.

*तुम्ही Glueing करताय हे कसं ओळखायचं?*

- भांडण झाल्यावर बोलून प्रश्न सोडवण्याऐवजी थेट शारीरिक जवळीक साधून पॅचअप करण्याचा प्रयत्न करणे.

- एकत्र असताना फक्त शारीरिक गोष्टींवरच बोलणं किंवा विचार करणं. मनातील भावना, भीती, स्वप्न यावर कोणतीही सखोल चर्चा नसणे.

- बाहेर फिरायला गेल्यावर किंवा मित्रांसोबत असताना अवघडल्यासारखं वाटणं, पण बेडवर सगळं ठीक असणं.

- हे नातं संपवायला हवं हे तुम्हाला माहीत असतं, पण शारीरिक सवयीमुळे तुम्ही बाहेर पडू शकत नाही.

*मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात? हा Red Flag कधी ठरतो?*

'इंडियन एक्सप्रेस'ला (Indian Express) दिलेल्या एका मुलाखतीत मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलंय की, ग्लुइंग खूप धोकादायक ठरू शकतं. हा एक 'इंटिमसी रेड फ्लॅग' (Intimacy Red Flag) आहे. जेव्हा भावनिक जोडणीऐवजी फक्त शारीरिक संबंधांचा वापर होतो, तेव्हा नात्यात एकटेपणा, अपराधीपणाची भावना आणि स्वतःबद्दलचा आदर कमी होऊ लागतो. हे असंच खूप काळ चालत राहिलं, तर नैराश्य (Depression) देखील येऊ शकतं.

*मग काय करायला हवं?*

१. स्वतःला प्रश्न विचारा - शारीरिक जवळीक वजा केली, तर या व्यक्तीसोबत तुमच्याकडे दुसरं काय उरतं?

२. भावनिक जवळीक (Emotional Intimacy) वाढवा. रोज २० मिनिटे फोन बाजूला ठेवून फक्त मनातील गोष्टी बोला.

३. जर तुम्हाला जाणवलं की फक्त शरीर उरलंय आणि मन नाही, तर हिंमत करून स्पष्ट बोला. 'क्लिअर-कोडिंग' (Clear-coding) हा २०२६ चा सर्वात मोठा डेटिंग ट्रेंड असणार आहे - म्हणजेच मनात जे आहे, ते थेट आणि स्पष्ट सांगून टाकणे.

नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या नात्याला जोडून ठेवणारा 'ग्लू' फक्त शरीर नसून मनही असतं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Sanjay Raut | Dussehra 2026 | दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा मोदी-शहांवर निशाणा
Uddhav Thackeray | Dussehra 2026 | शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे