Waynad landslide: चमत्कार! 40 दिवसांची मुलगी व 6 वर्षीय मुलगा पुरात सापडले जिवंत

Published : Aug 03, 2024, 07:38 PM IST
waynad

सार

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनात मृतांची संख्या 319 वर पोहोचली आहे, तर 200 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. चार दिवस चाललेल्या बचाव मोहिमेदरम्यान एका चमत्कारिक घटनेत 40 दिवसांची मुलगी आणि 6 वर्षीय मुलाला पूरग्रस्त भागातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने आतापर्यंत 319 जणांचा बळी घेतला आहे. चार दिवसांपासून बचावकार्य सुरू असतानाही 200 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेपासून लष्कर आणि एनडीआरएफचे पथक सातत्याने बचावकार्यात गुंतले आहेत. यादरम्यान शुक्रवारी वायनाडमध्येही एक चमत्कार पाहायला मिळाला. होय, हा निसर्गाचा चमत्कार म्हणता येईल की, दरड कोसळण्याच्या घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 40 दिवसांचे बाळ आणि 9 वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. इतके दिवस ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर जिवंत बाहेर येणे चमत्कारापेक्षा कमी नाही.

अनारा आणि हयान यांनी जगण्यासाठी केला संघर्ष

वायनाडमधील दुर्घटनेमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आणि हजारो लोक त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त झाले. 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला पण निसर्गाचा चमत्कारही इथे पाहायला मिळाला. येथे चौथ्या दिवशी जोरदार पूर आणि भूस्खलनाच्या दरम्यान, 40 दिवसांची मुलगी अनारा आणि तिचा 6 वर्षांचा भाऊ मोहम्मद हयान यांनी मृत्यूला हरवले आहे. बचाव पथकाने दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे.

अनाराच्या आईने आपल्या मुलांना धरले होतं छातीशी 

आई तंजिरा आपली ४० दिवसांची मुलगी अनारा आणि मुलगा हयान यांच्यासोबत गच्चीच्या भिंतीला चिकटून बसली होती, पण त्याच दरम्यान तिचा मुलगा हयान जोराच्या प्रवाहाने वाहून गेला आणि काही अंतरावर गेल्यावर त्याला तो ताऱ्यांच्या जाळ्यात अडकला. तो जिवंत होता आणि त्याच्या सर्व शक्तीने ताऱ्यांना धरून होता. पाऊस आणि थंडीचा सामना करताना 40 दिवसांची अनाराही थरथर कापत होती पण तिने धीर सोडला नाही आणि बचाव पथकाने दोघांना सुखरूप वाचवले. मात्र, या घटनेत त्याच्या आईला जीव गमवावा लागला. त्यामुळे या आस्मानी संकटाशी दोन हात करणाऱ्या या चिमुकल्यांवरील मायेच छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी गमवला जीव

वायनाडमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचाव पथक सातत्याने शोध मोहीम राबवत असून मृतदेहांसह जखमींना दररोज बाहेर काढले जात आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरही बचाव कार्यात गुंतले आहेत.

आणखी वाचा :

वायनाड-हिमाचलच्या आधीचे 5 धोकादायक भूस्खलन, एकात 4200 हून अधिक गावं गेली वाहून

PM मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, चीन-अमेरिका टॉप 10 मधून गायब

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!