वायनाड भूस्खलनग्रस्तांचे दुःख जाणण्यासाठी राहुल-प्रियांका गांधी ग्राउंड झिरोवर

Published : Aug 01, 2024, 05:18 PM ISTUpdated : Aug 01, 2024, 05:38 PM IST
Rahul Gandhi and Priyanka Gandhi Wayanad

सार

केरळमधील वायनाड येथे भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बाधितांशी संवाद साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

Wayanad Landslide updates : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी गुरुवारी केरळमधील वायनाड येथे पोहोचले. वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. भूस्खलनात चार गावे वाहून गेली आहेत. तर 256 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. ग्राउंड झिरोवर पोहोचल्यानंतर दोन्ही नेत्यांनी बाधित लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

खराब हवामान असतानाही दोन्ही नेते बाधितांच्या भेटीला

खराब हवामान असतानाही गुरुवारी दोन्ही नेते बाधितांची भेट घेण्यासाठी पोहोचले. सकाळी 9.30 च्या सुमारास वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी कन्नूर विमानतळावर उतरले. येथून दोघेही वायनाडला रवाना झाले. अलप्पुझाचे खासदार केसी वेणुगोपाल हेही त्यांच्यासोबत होते.

चुरलमळा दरड कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते सीएचसी, डॉ. मूपेन मेडिकल कॉलेज आणि मेपाडी येथील मदत शिबिरात पोहोचले. पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. घटनेची माहिती घेतली. तसेच लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शिबिरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

राहुल गांधी दोन वेळा वायनाडमधून झाले खासदार

राहुल गांधी 2019 मध्ये वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आले. विक्रमी मतांनी विजयी झालेल्या राहुल गांधींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन जागा जिंकल्या आहेत. पण राहुलने आईने सोडलेली रायबरेलीची जागा कायम ठेवली आणि वायनाडमधून राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करणार आहेत.

भूस्खलनामुळे अनेक भागांचा पूर्णपणे तुटला संपर्क  

मंगळवार, 30 जुलै रोजी सकाळी वायनाडमधील मेप्पडीच्या डोंगराळ भागात तीन तासांत चार मोठ्या भूस्खलनाने सर्वत्र हाहाकार माजवला. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा येथे भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान झाले. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, बहुतांश रस्ते खचले आहेत. अनेक पूल वाहून गेले. बहुतांश भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

आणखी वाचा : 

Waynad Landslide : वायनाडमधील अँब्युलन्सचा व्हिडीओ पाहून भीतीने उडेल थरकाप...

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!