Viral Video: चालत्या ट्रेनच्या AC कोचमध्येच बनवला बार, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Published : Jul 11, 2026, 01:58 PM IST
Viral Video: चालत्या ट्रेनच्या AC कोचमध्येच बनवला बार, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सार

एका AC ट्रेनच्या डब्यात काही तरुण चक्क दारू पित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, रेल्वे प्रवासातील गर्दी, गैरवर्तन आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

एकेकाळी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट समजले जाणारे AC कोच आता गर्दी, गैरवर्तन आणि सुरक्षेच्या समस्यांमुळे चर्चेत आहेत. आता असाच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवासावरचा लोकांचा विश्वास का उडत चालला आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

X वर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या AC डब्यात बसून दारू पित आहेत. आजूबाजूला इतर प्रवासीही दिसत होते, तरीही हे तरुण चालत्या ट्रेनमध्ये एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत दारू ओतून कॉकटेल बनवत होते.

या तरुणांपैकीच एकाने, पिंटू कुमारने, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. साईड लोअर बर्थवर बसलेला एक तरुण पडद्याआड लपून ड्रिंक बनवत होता, जेणेकरून इतरांना दिसू नये. त्याचे मित्र त्याला बघत होते. दारूसोबत खाण्यासाठी आणलेला स्नॅक्सचा पुडाही व्हिडिओत दिसतोय.

व्हायरल व्हिडिओ पाहा

 

 

इंटरनेटवर संतापाची लाट

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक कुटुंबं, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक AC कोचमधून प्रवास करतात, अशा ठिकाणी हे कसं घडू शकतं, असा प्रश्न लोक विचारत आहेत. अनेकांनी रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका युझरने लिहिलं, “Inko penalty aisi lagao future m koi himmat na kre wine pine ki or na pi kr chale train mein.”

दुसऱ्या युझरने म्हटलं, “Rules, laws, morals now only exist in books, not ingrained in Indians.” तर आणखी एकाने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटलं, “In new India, rules don’t exist anymore. It’s about whims & wishes of the bully, forced upon the helpless. One incident of alcohol in train is video recorded & shown here, where lakhs of such incidents occur daily where families suffer & authorities do not care.”

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bihar Boat Tragedy: बिहारमध्ये गंगेत बोट उलटली, १३ निष्पाप मुलांचा मृत्यू
Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?