Viral Ad: माझ्यासोबत फक्त Reels बनवणारा नवरा हवा! तरुणीची अजब जाहिरात व्हायरल

Published : May 19, 2026, 10:00 PM IST

Viral Ad: ‘जो कॅमेऱ्यासमोर लाजणार नाही आणि माझ्यासोबत रील्स बनवेल, असा नवरा हवाय!’ एका तरुणीची ही विचित्र मॅट्रिमोनिअल जाहिरात सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

PREV
14
विचित्र मॅट्रिमोनिअल जाहिरात
सध्या सोशल मीडियावर एक मॅट्रिमोनिअल जाहिरात (matrimonial ad) सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नाच्या जाहिरातीत सहसा नोकरी, पगार, कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल विचारलं जातं. पण इथे तर गोष्टच वेगळी आहे!
24
रील पार्टनर
रिया नावाच्या तरुणीने तिच्या लग्नाच्या जाहिरातीत लिहिलंय, 'मला फक्त नवरा नको... तर एक रील पार्टनरही हवा आहे.' तिने काही अटीही ठेवल्या आहेत. जसं की, मुलगा 'कॅमेरा शाय' नसावा, 'रिलेशनशिप रील्स' बनवण्यासाठी तयार असावा आणि 'ट्रेंडिंग गाण्यांवर' रील्स बनवता आले पाहिजेत.
34
लग्नाची जाहिरात
इतकंच नाही, तर 'ब्राऊन बॉईजला प्राधान्य' (Brown boys preferred) आणि 'MO-MO-MO ट्रेंड माहित असावा' या उल्लेखांमुळे ही पोस्ट आणखी व्हायरल झाली. ही जाहिरात पाहून नेटकरी म्हणत आहेत, 'ही लग्नाची जाहिरात आहे की इन्फ्लुएन्सरला कामावर ठेवण्याची?' तर काही जण 'आजच्या पिढीसाठी प्रेमापेक्षा कंटेंट महत्त्वाचा झालाय' असं म्हणत तिला ट्रोल करत आहेत.
44
मॅट्रिमोनिअल जाहिरात
एकंदरीत, ही विचित्र मॅट्रिमोनिअल जाहिरात सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाली आहे आणि नेटकऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक मोठा विषय बनली आहे.
Read more Photos on

Recommended Stories