Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी PHOTOS

Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामध्ये श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी केली.

Harshada Shirsekar | Published : Feb 19, 2024 12:21 PM IST / Updated: Feb 19 2024, 05:55 PM IST
14

Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामध्ये श्री कल्कि धाम मंदिराची (Shri Kalki Dham Temple)पायाभरणी केली. तसेच त्यांनी श्री कल्कि धाम मंदिराच्या प्रतिकृतीचेही अनावरण केले. श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे या मंदिराची उभारणी केली जात आहे. आचार्य प्रमोद कृष्णम हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

24

या कार्यक्रमामध्ये अनेक संत, धर्मगुरू आणि अन्य मान्यवरही सहभागी झाले होते. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आचार्य प्रमोद कृष्णम देखील उपस्थित होते. पायाभरणी (Shri Kalki Dham Mandir) सोहळा पार पाडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले.

34

10 गर्भगृह असणारे मंदिर

अनेक एकरांवर पसरलेल्या जमिनीवर या मंदिराची (Shri Kalki Dham Mandir) उभारणी करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये 10 गर्भगृहांचा समावेश आहे.

44

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळेस असे म्हणाले की, "आज एकीकडे आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास होत आहेत, तर दुसरीकडे शहरांमध्ये हायटेक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहे. देशभरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयेही बांधली जात आहेत. आज आपली प्राचीन शिल्पेही अन्य देशांतून पुन्हा आणली जात आहेत आणि परदेशी गुंतवणूकही विक्रमी संख्येने होत आहे".

आणखी वाचा

PM Modi Jammu Visit : PM मोदींचा 20 फेब्रुवारीला जम्मू दौरा; 30,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : गडकोट-किल्ले हा आपला ठेवा, तो जपण्याचे काम करू - CM एकनाथ शिंदे

WATCH VIDEO : राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी अखिलेश यादवांची मोठी अट, आता सपा INDIA आघाडीला देणार का धक्का?

Share this Photo Gallery