प्रश्न 5 - राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून तुमच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती आपणास सर्वप्रथम समजली. तेव्हा तुम्ही फोनचे उत्तर देत नव्हतात, असे मी ऐकले. ‘फोन उचला, तुमच्या उमेदवारीसंदर्भात घोषणा होत आहे’, हा संदेश देण्यासाठी कोणीतरी सायकल चालवून तुमच्यापर्यंत आले होते.
द्रौपदी मुर्मू : बरोबर आहे. माझा फोन कधी-कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने लागत नाही. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनचे मी उत्तर देत नाही. राज्यपाल म्हणून कार्यरत असताना एक पी.एस. होते, ते एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होते. त्यांचा फोन आला. दिल्लीहून फोन येत असल्याची माहिती त्यांनी मला दिली. तुम्ही फोनचे उत्तर देत नसल्याने मी धावत-धावत आलो आहे. त्यांचे हात पाय थरथरत होते. पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांना माझ्याशी का बोलायचे आहे, याचे मला आश्चर्य वाटू लागले. मग त्यांनी आलेल्या क्रमांकावरच फोन लावला. समोरून मला पंतप्रधानांचा (PM Narendra Modi) आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, आम्हाला तुम्हाला राष्ट्रपती करायचे आहे. मी याचा कधीही विचार केला नव्हता. माझे हातपाय पूर्णपणे सुन्न पडले होते. यावर मी काही बोलूही शकले नव्हते.