Uttar Pradesh : लग्नाच्या एक दिवस आधी नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू

Published : May 07, 2025, 02:42 PM IST
Indore Labour Death

सार

उत्तर प्रदेशातील एका नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील बदायू येथील एका नववधुचा हळदीच्या कार्यक्रमात डान्स करताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे. दीक्षा सिंह असे तरुणीचे नाव आहे.

दीक्षा सिंहचे 5 मे रोजी लग्न होणार होते. पण लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात दीक्षाचा मृत्यू झाला. खरंतर, हळदीच्या कार्यक्रमात दीक्षा पाहुणे मंडळींसोबत डान्स करत होती. त्यावेळीच तिला खूप थकवा जाणवू लागला. यावेळी दीक्षाच्या प्रकृतीकडे गंभीर्याने लक्ष दिले नाही. यानंतर दीक्षा शौचालयासाठी गेली असता आणि खूप वेळ बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला. पण कोणतेही उत्तर न मिळाल्याने अखेर शौचालयाचा दरवाजा तोडला गेला. तेव्हा दीक्षा बेशुद्ध अवस्थेत दिसली. यावेळी दीक्षाला हृदयविकाराचा झटका आला होता.

दीक्षाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दीक्षाचे लग्न मुरदाबाद जिल्ह्यातील शिवपुरीमध्ये राहणाऱ्या सौरभसोबत होणारे होते. सौरभ एका स्थानिक कारखान्यात काम करतो.

PREV

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!