UP : वसतिगृहात जेवल्यानंतर बिघडली प्रकृती, अवघ्या दोन तासांत डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नक्की काय घडले?

Published : May 23, 2025, 01:36 PM IST
Indore Labour Death

सार

उत्तर प्रदेशातील एका 30 वर्षीय तरुण डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मृत्यूपूर्वी त्याला मळमळ, उलट्या आणि छातीत दुखण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 30 वर्षांचा असलेला डॉ. विवेक कुमार पांडे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये इंटर्नशिप करत होते. प्रतापगडचे रहिवासी असलेले विवेक यांनी 2018 मध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. बुधवारी (23 मे) रात्री शहीद पथ येथील इंटर्न हॉस्टेलमध्ये जेवण केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. काही वेळातच त्यांना मळमळ, उलट्या आणि छातीत तीव्र दुखणं जाणवू लागलं.

केवळ दोन तासांच्या आत त्यांना 8 ते 10 वेळा उलट्या झाल्या आणि सहकारी डॉक्टरांनी तात्काळ त्यांना लोहिया इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केलं. त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती आणि त्यांनी शक्य ती सर्व उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यानच डॉक्टर विवेक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. भुवन चंद तिवारी यांनी सांगितलं की, डॉ. विवेक यांना आधीपासूनच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ते नियमितपणे औषधं घेत होते. मृत्यूपूर्वी त्यांच्या ECG आणि Troponin-T (ट्रॉप-टी) चाचण्या करण्यात आल्या. दोन्ही वेळा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, अनेक वेळा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होऊनही चाचण्या नॉर्मल येतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचं ही घटना अधोरेखित करते. अयोग्य जीवनशैली, मानसिक तणाव, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आता तरुणांमध्येही गंभीर ठरू लागले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!