
दुसरीकडे लग्न करत असल्याचं समजल्यावर डेहराडून, उत्तराखंड येथील एक तरुणी थेट ढोल-ताशे, बँडबाजा आणि वरमाला घेऊन आपल्या कथित बॉयफ्रेंडच्या घरी उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात पोहोचली. ऐलम शहरात असलेल्या त्याच्या घरी तिने कुटुंबासह धडक दिली आणि त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरला. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सोनिया असं या तरुणीचं नाव असून, ती २०१६ पासून ऐलमच्या अंकुशसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने म्हटलंय. त्याने लग्नाचं वचन दिलं होतं, पण काही वर्षांनंतर त्याने बोलणं बंद केल्याचा तिचा आरोप आहे. अंकुशच्या लग्नाची तयारी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. २१ नोव्हेंबरला त्याची वरात दिल्लीला जाणार होती.
In #Shamli, #UttarPradesh, Ankush was about to marry another girl after a 7-year relationship. Sonia from #Dehradun arrived at his home with a wedding procession, complete with music and fanfare. Police arrived at the scene, and Sonia staged a sit-in outside the house. https://t.co/jO5WemOdF2
— Siraj Noorani (@sirajnoorani) November 20, 2026
सोनियाच्या म्हणण्यानुसार, ती आणि अंकुश अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१९ नंतर त्याने अचानक तिच्याशी बोलणं बंद केलं. त्याने मोबाईल नंबरही बदलला, त्यामुळे तिला संपर्क करता आला नाही.
संपर्क तुटल्याने ती प्रचंड अस्वस्थ झाली आणि तिने डेहराडूनच्या पोलीस ठाण्यात अंकुशविरोधात तक्रार दाखल केली.
तिचा दावा आहे की, केस दाखल झाल्यानंतर अंकुश तिच्या घरी आला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. यामुळे तिला त्यांच्या लग्नाची आशा वाटू लागली. मात्र, त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क तोडल्याचा आरोप तिने केला.
उत्तर प्रदेश के शामली में प्रेमी की दूसरी शादी की खबर सुनकर एक युवती ढोल-नगाड़े और वरमाला लेकर उसके घर पहुंच गई। देहरादून से अपने परिजनों के साथ आई युवती ने प्रेमी अंकुश से शादी करने की जिद पकड़ ली और घर के बाहर जमकर हंगामा किया। इस दौरान दोनों परिवारों के बीच तीखी नोकझोंक भी हुई।
युवती सोनिया का दावा है कि वह 2016 से अंकुश के साथ रिलेशनशिप में है और उसने उससे शादी का वादा किया था। सोनिया के मुताबिक, अंकुश ने 2019 के बाद उससे बातचीत बंद कर दी थी। अब उसे पता चला कि अंकुश 21 नवंबर को दूसरी युवती से शादी करने जा रहा है। इसी के बाद वह वरमाला लेकर उसके घर पहुंच गई। हंगामे की सूचना पर पुलिस मौके पर पहुंची और युवती को परिजनों के साथ चौकी ले गई।
#AajTakSocial #ATReel #Shamli #UttarPradesh LoveStory LoveDrama WeddingDrama Girlfriend Boyfriend Marriage HighVoltageDrama Viral
— AajTak (@aajtak) November 20, 2026
अंकुश दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं सोनियाला नुकतंच समजलं. लग्नाची तारीख जवळ आल्याने ती डेहराडूनहून ऐलमला कुटुंबासह, ढोल-ताशे आणि वरमाला घेऊन पोहोचली.
तिने अंकुशचं घर गाठलं आणि त्याने दिलेलं लग्नाचं वचन पूर्ण करावं, असा हट्ट धरला. या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे परिसरातील लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि घराबाहेर मोठी गर्दी जमली.
हा वाद इतका वाढला की सोनियाचं कुटुंब आणि अंकुशचे नातेवाईक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सोनिया लग्नाच्या मागणीवर ठाम होती आणि घराबाहेर दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता.
या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सोनिया आणि तिच्या कुटुंबाला पोलीस चौकीत नेलं.
सोनियाने बॅचलर ऑफ सायन्स (BSc) ची पदवी घेतली असल्याचं सांगितलं, तर अंकुश मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो.
त्यांचं रिलेशनशिप २०१६ मध्ये सुरू झालं होतं आणि त्याने लग्नाचं वचन दिलं होतं, यावर ती ठाम होती. मात्र, सोनियाच्या या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
दुसरीकडे, २१ नोव्हेंबरला होणाऱ्या अंकुशच्या लग्नाची तयारी त्याच्या घरी सुरूच होती.