UP Teacher Suspended: विद्यार्थ्याच्या टक्कलवर शिक्षकाने वाजवला तबला, व्हिडिओ व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Oct 09, 2026, 04:36 PM IST
UP Teacher Suspended: विद्यार्थ्याच्या टक्कलवर शिक्षकाने वाजवला तबला, व्हिडिओ व्हायरल

सार

उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या टक्कल केलेल्या डोक्यावर तबल्यासारखी थाप मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिनेश कुमार माथूर असं या शिक्षकाचं नाव असून, फेसबुकवर व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका प्राथमिक शिक्षकाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिनेश कुमार माथूर असं या शिक्षकाचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये ते एका विद्यार्थ्याच्या टक्कल केलेल्या डोक्यावर तबल्यासारखी थाप मारताना दिसत आहेत. ही घटना सैफई ब्लॉकच्या बिरौली गावातील प्राथमिक शाळेत घडली आहे. या प्रकारानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत असून, शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

माथूर हे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. त्यांनी स्वतःच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्याच्या डोक्यावर थाप मारताना जोरजोरात हसताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, वर्गातील इतर मुलेही हे पाहून हसत होती. व्हिडिओमध्ये माथूर खुर्चीवर आरामात बसलेले दिसतात, तर तो लहानगा विद्यार्थी त्यांच्यासमोर जमिनीवर बसलेला आहे. विद्यार्थ्याला किती त्रास होत असेल, याची कोणतीही पर्वा न करता ते त्याच्या डोक्यावर एखाद्या ढोलकासारखी थाप मारत होते.

कसा व्हायरल झाला व्हिडिओ?

सुरुवातीला दिनेश कुमार माथूर यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर हा वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला होता. पण त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही वेगाने पसरला आणि व्हायरल झाला.

प्रशासनाची धडक कारवाई

हा व्हिडिओ व्हायरल होताच बेसिक शिक्षा अधिकारी (BSA) डॉ. राजेश कुमार यांनी दिनेश कुमार माथूर यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. इटावा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी माथूर यांचं हे वागणं गंभीर बेशिस्तपणाचं मानलं आहे. यामुळे एका शिक्षकावर असलेल्या विश्वासाला तडा गेला आहे. व्हिडिओ वेगाने पसरल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने ही कारवाई करत, अशा प्रकारचं वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

निलंबनाच्या कारवाईनंतर आता शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, यापूर्वी अशा काही तक्रारी आल्या होत्या का, आणि वर्गातील एकूण वातावरण कसं होतं, या सगळ्याची माहिती घेतली जात आहे. शाळेतील इतर कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई ठरवली जाईल. या घटनेमुळे फक्त इटावाच नाही, तर संपूर्ण उत्तर प्रदेशातील शाळांमधील शिक्षकांच्या वर्तनाकडे लक्ष वेधलं गेलं आहे. तसेच मुलांची सुरक्षा आणि शिक्षकांच्या नैतिकतेवरही चर्चा सुरू झाली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Zomato Success Story: झोमॅटोची ५० हजारांची नोकरी सोडली, आता ही तरुणी महिन्याला कमवतेय २.२८ लाख!
Ritu Negi Controversy: अर्जुन पुरस्कार विजेत्या रितू नेगीला १ कोटींच्या बक्षिसातून का वगळलं?