उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

UP CM Yogi Adityanath Threat to Bomb Call : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. याशिवाय ज्या क्रमांकावर धमकीचा फोन आला होता तो ट्रेस करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे.

सीयूजी क्रमांकावर आला होता फोन
मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन सीयूजी क्रमांकावर आला होता. खरंतर धमकीचा फोन 2 मार्चला आला होता. फोनवरील व्यक्तीने उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. सध्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून चार टीमची स्थापना
आरोपीची ओखळ पटवण्यासह त्याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल. याआधी मुख्यमंत्र्यांना आणि राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी लखनऊ येथून ताब्यात घेतले होते.

आणखी वाचा : 

Karnataka : कर्नाटक विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या दिल्या घोषणा, एफएसएलच्या अहवालात झाला खुलासा

Rameshwaram Cafe : बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाची एनआयएकडे दिली जबाबदारी, गृह मंत्रालयाने दिली माहिती

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आसनसोलमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला निर्णय जाहीर

Share this article