केंद्रीय अर्थसंकल्प 2026: विविध क्षेत्रांत AI चा वापर वाढणार!

Published : Feb 01, 2026, 11:43 AM IST
ai

सार

केंद्रीय अर्थसंकल्प 2026: विविध क्षेत्रांत AI चा वापर वाढणार! निर्मला सीतारामन यांचे स्पष्ट संकेत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. परंपरेला छेद देत यंदा पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाला. देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे, सामान्य माणसावरील करांचा बोजा कमी करणे आणि भविष्यवेधी तंत्रज्ञानातील गुंतवणूक वाढवणे हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल पायाभूत सुविधा आणि स्टार्ट-अप क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. सरकारी सेवांमध्ये एआयचा वापर वाढवून कामात वेग आणि पारदर्शकता आणण्याची योजना असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

शिक्षण, आरोग्य, कृषी आणि प्रशासनात तंत्रज्ञान-आधारित सेवा सुरू करण्याची रूपरेषाही सादर करण्यात आली आहे. तसेच, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज सहाय्य आणि रोजगार निर्मितीसाठी सरकारी गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे. कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तरतूद वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. रेल्वे, रस्ते आणि डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवून देशाच्या सर्वांगीण विकासाचा वेग वाढवण्यावरही अर्थसंकल्पीय भाषणात भर देण्यात आला.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

IOC, BPCL आणि HPCL च्या डॉलरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी RBI ची नवी सुविधा
EaseMyTrip : ईझमायट्रिपची 'योलो बस एक्सप्रेस' सुरू, आता बस प्रवास होणार आणखी सुखकर