
महाराष्ट्राचे शिल्पकार आणि दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत कराड जिल्हा सातारा, येथे कराड नगरपरिषदेकडून शारदीय व्याख्यानमाला 2026चे आयोजन करण्यात आले आहे, यात आएएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी कराडकरांनी संवाद साधला, यावेळी कराडकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तुकाराम मुंढे यांनी महाभारतातील ते आधुनिक काळातील काही उदाहरणं देत, युवकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, हा कार्यक्रम कराडकर कानात जीव आणून ऐकत होते.