सणांतील अन्न तपासणीवर तुकाराम मुंढेंचा नवा आदेश | Tukaram Mundhe | Press Conference Part 3

सणांतील अन्न तपासणीवर तुकाराम मुंढेंचा नवा आदेश | Tukaram Mundhe | Press Conference Part 3

Published : Sep 04, 2026, 05:02 AM IST

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पत्रकार परिषदेचा हा तिसरा भाग. सण-उत्सवांच्या काळातील अन्नसुरक्षेसाठी महाराष्ट्र FDAने वर्षभर लागू राहणारा स्थायी आदेश जारी केला आहे. प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेशाऐवजी वर्षभराचे कॅलेंडर तयार करण्यात आले असून सणांचे राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक अशा तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आले आहे. FDAची कारवाई सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सणानंतर 30 दिवसांपर्यंत चार टप्प्यांत चालणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, उपवासाचे पदार्थ, मांस, पाणी-बर्फ, मिठाई, खाद्यतेल, सुकामेवा, बेकरी पदार्थ आणि इतर उच्च जोखमीच्या अन्नपदार्थांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. महाप्रसाद, इफ्तार मेजवानी, अन्नछत्र, लंगर आणि भंडाऱ्यासारख्या सामूहिक अन्नवाटपाच्या ठिकाणी FDA अधिकारी तपासणी करणार आहेत. संबंधित माहिती किमान सात दिवस आधी देण्याची तरतूदही नव्या आदेशात करण्यात आली आहे.