Shiv Sena | Sonia Gandhi | सोनिया गांधींच्या पुस्तकाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध

Shiv Sena | Sonia Gandhi | सोनिया गांधींच्या पुस्तकाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध

Published : Nov 18, 2026, 04:03 PM IST

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या मजकुरावर आक्षेप घेतला. पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने आणि छायाचित्र फाडून निषेध करण्यात आला. सावरकरांचा अवमान केल्याचा आरोप करत प्रकाशक HarperCollins कडे पान क्रमांक २०१ आणि ४४३ वरील मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली. सोनिया गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशीही मागणी केली. तसेच पुस्तक स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरेंवर टीका करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शीखविरोधी हिंसाचार, काश्मीर आणि कथित घोटाळ्यांचा उल्लेख करत पुस्तकातील निवडक मांडणीवरही शिवसेनेने आक्षेप घेतला.