
पार्थ पवार यांनी दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतली, यावरुन संजय राऊत यांनी सांगितलंय की शिवसेना - एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादी - अजित पवार या पक्षांचं भवितव्य आणि दिशा ही दिल्लीतून ठरवली जाते, तसेच सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला त्यांच्या पक्षातही महत्त्व राहिलेलं नाही. कारण ते तिकडे अस्वस्थ आहेत. भाजपाची वागणूक मित्र पक्षाला घरगड्यासारखी असते, ज्यांच्या डोक्यावर लाल दिवे आहेत, तेच खुश आहेत. इतर अस्वस्थ आहेत, पण आम्हाला ही वागणूक पसंत नव्हती म्हणून स्वाभिमान राखून आम्ही बाहेर पडलो, याचा आम्हाला गर्व असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.