Manoj Jarange Pati | lजखमांच्या प्रकरणी जरांगेंची CID तपासाची मागणी

Manoj Jarange Pati | lजखमांच्या प्रकरणी जरांगेंची CID तपासाची मागणी

Published : Nov 08, 2026, 01:02 PM IST

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या पारदर्शकतेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. फोटोमध्ये जखमा दिसत असल्याने हे हत्येचे प्रकरण असल्याचा दावा करत CID आणि SIT मार्फत तपासाची मागणी केली. सरकार गुंडांना पाठबळ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. येवल्यातील वर्षभरापूर्वीच्या कथित अत्याचार प्रकरणात आमदार पातळीवरील व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत, त्याची खातरजमा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचा दावाही त्यांनी केला. संबंधितांना पाठीशी न घालता तुरुंगात टाकण्याची मागणी केली. स्वतःच्या ऑडिओ क्लिप प्रकरणातील SIT तपासावरूनही त्यांनी सरकार आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांना इशारा दिला.