Delimitation Bill | Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा

Published : Nov 29, 2026, 05:02 PM IST

मतदारसंघ पुनर्रचना ही काळाची गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला. मतदारसंघांची संख्या वाढल्याने शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळात लाडकी बहीण योजनेचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांचे कौतुक केले. शरद पवार, स्टॅलिन यांच्यासह विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व नेत्यांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.