मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करणे ही लबाडी असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. २०२३ मध्ये पुनर्रचनेसह महिला आरक्षणाला मान्यता देणारे विरोधक आता विरोध का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व राज्यांच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्के वाढ केल्याने महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांना फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. दक्षिणेतील १२० पैकी ७५ खासदारांनी विधेयकाला समर्थन दिल्याचे सांगत शरद पवारांच्या पक्षाच्या भूमिकेचाही उल्लेख केला. राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देत महिला आरक्षण लागू होणारच, असा विश्वास व्यक्त केला. इंडिया आघाडीच्या डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नांवर ‘अब बहुत देर हो गई’, अशी प्रतिक्रिया दिली.