12 ऑगस्ट 2024 च्या टॉप 10 न्यूज, कोणत्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी?

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची रणनीती आखली आहे. याशिवाय, राज्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.

Rameshwar Gavhane | Published : Aug 12, 2024 2:45 PM IST

  1. देवेंद्र फडणवीसांना भाजपाची धुरा, महत्त्वाची जबाबदारी सोपवली

लोकसभा निवडणुकीत झालेल्या फटक्यांनंतर, भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यातील उमेदवारांच्या तिकीट वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

2. महायुतीच्या बैठकीत गमछावरून राजकारण, उदय सामंतांनी दिले स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या बैठकीत मंत्री सावेंच्या गळ्यातील गमछावरील चिन्हांवरून वाद निर्माण झाला. गमछावर शिवसेना आणि भाजपचे चिन्ह असून राष्ट्रवादीचे घड्याळाचे चिन्ह नसल्याने नाराजी व्यक्त झाली. यावरून मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.

3. उद्धव ठाकरेंवर टीका करत बावनकुळेंचा पलटवार, कोण खोटारडेपणा करतंय?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत असल्याने त्यांना सर्वत्र लबाडीच दिसते. तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना होईल, असेही ते म्हणाले.

4. राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून सुरू असलेल्या राजकारणावरून शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना पवारांनी राजकीय खेळी असल्याचे म्हटले आहे.

5. भुजबळांचे आव्हान जरांगे स्वीकारणार का?, 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला होता. छगन भुजबळ यांनी त्यांना आव्हान दिले होते की ते 8 जागा जिंकून दाखवावेत. आता जरांगे हे आव्हान स्वीकारण्याची शक्यता आहे.

6. माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण

माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे.

7. कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर: ममता बॅनर्जींनी पोलिसांना किती दिवसांची दिली मुदत?

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी सुरक्षा आणि न्यायसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

8. राहुल गांधी सर्वात धोकादायक व्यक्ती, देशाचा नाश करण्याचा अजेंडा : कंगना राणौत

चित्रपट अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना 'सर्वात धोकादायक व्यक्ती' असे म्हटले आहे. हिंडनबर्ग अहवालाबाबत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करताना कंगनाने हे वक्तव्य केले आहे.

9. जेहानाबाद मंदिरात चेंगराचेंगरी: ७ भाविकांचा मृत्यू, जखमींची संख्या जास्त

सावनच्या चौथ्या सोमवारी जेहानाबादमधील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांवर लाठीमार केल्याचा आरोप केला आहे.

10. 1971 मध्ये पाकिस्तानचा आत्मसमर्पण पुतळा पाडला, भारताच्या विरोधकांनी रचला कट

बांगलादेश मुक्ती युद्ध स्मारकातील पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाचा पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या घटनेला भारतविरोधी कृत्य असल्याचे म्हटले आहे.

 

Share this article