नवविवाहित जोडप्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या; नगरमधील घटनेने खळबळ

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका नवविवाहित जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कुटुंबीयांसह गावातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अहमदनगरमध्ये एका नवविवाहित जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील साकूर गावात ही घटना घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे वय २२ वर्षे तर मुलाचे वय २२ वर्षे आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दोघांनी तीन महिन्यांपूर्वीच लग्न केले होते. मात्र, आता दोघांनीही अचानक आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रविवारी सायंकाळी साकूर येथील मुळा नदीजवळील मंगमळ येथे एका नवविवाहित जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिक नागरिक व साकूर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून घारगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. घारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तानाचा पंचनामा झाला मात्र दोघांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.

'हे' जोडपे पुण्यात नोकरी करत होते

हे दाम्पत्य पुण्यात राहायचे आणि काम करायचे. दोघेही काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील त्यांच्या गावी परतले होते. त्यानंतर एके दिवशी दोघांनी झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. दोघांचेही मृतदेह झाडाला लटकलेले पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

'या' दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत

पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. या दाम्पत्याने आत्महत्या का केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या दोघांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली की नाही, याबाबत कोणतीही माहिती नाही. नव-या दाम्पत्याचा दुःखद अंत झाल्याने साकुर गावात शोककळा पसरली आहे. मात्र, दोघांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Share this article