Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!

Rohit Pawar | गोकुळच्या निवडणुकीवर रोहित पवारांचा आक्षेप!

Published : Nov 09, 2026, 05:02 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सरकारवर टीका केली. कर्जमाफीचा लाभ अद्याप ८० टक्के लोकांना मिळालेला नाही, तर दिवाळीसाठी जाहीर केलेले ५ हजार रुपये ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा त्यांनी केला. हेक्टरी मदत जाहीर न होणे, जनावरांसाठी चारा न मिळणे आणि मायक्रोफायनान्सच्या समस्येवर कारवाई न होण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच गोकुळ दूध संघात काँग्रेस विचारांच्या पॅनेलला बहुमत मिळाल्यानंतर सरकारने चार अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय संविधानविरोधी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांचे अधिकार मागे न घेतल्यास कोल्हापुरातील आंदोलन राज्यभर पसरेल, असा इशारा दिला. सरकारचे लक्ष शेतकऱ्यांऐवजी सत्ता टिकवणे आणि पक्ष फोडण्यावर असल्याची टीकाही त्यांनी केली.

20:09Vivekanand Patil | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | गोकूळ संघर्ष मोर्चा | Kolhapur Gokul Morcha
04:50Sanjay Raut | सुनील तटकरे यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीत महत्त्व नाही, म्हणून विलिनीकरणाचा विषय |
03:07Sanjay Shirsat | शिंदेंच्या आदेशावर संजय शिरसाटांचं वक्तव्य
09:10Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची दिवाळी; शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
03:50Rohit Pawar | रोहित पवार यांच्यावर मजुरांचे पावणेतीन कोटी थकवल्याचा आरोप
12:05Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी
03:37Diwali Bonus | मालकाकडून लाखांची बंडलं वाटप, कॉर्पोरेट कंपनीपेक्षा लालांनी परवडला | Surat Bonus
09:02Manoj Jarange Pati | lजखमांच्या प्रकरणी जरांगेंची CID तपासाची मागणी
04:41Girish Mahajan | जळगावात वैद्यकीय विभागांचं उद्घाटन: गिरीश महाजन