तिरुपती मंदिरात वैकुंठ द्वार दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी होत चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यावर आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केला आहे.
Tirupati temple stampede : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी (08 जानेवारी) रात्री वैकुंठ द्वार दर्शनासाच्या तिकीट केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. 10 दिवसापर्यंत चालणाऱ्या विशेष दर्शनाच्या तिकीटासाठी 4 हजारांहून अधिक संख्येने भाविकांनी गर्दी केली असता ही घटना घडली. यावर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले की, घटनेबद्दल फार दु:खी आहे. अधिकाऱ्यांना घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती मंदिरातील घटनेवरुन प्रतिक्रिया देत म्हटले की, "मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. याशिवाय जखमी व्यक्तींनाही लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेशातील सरकार घटनेतील प्रभावित प्रत्येत व्यक्तीला शक्य तेवढी मदत करेल."
तिरुमाला तिरुपती देवस्थानमद्वारे आयोजित करण्यात आलेल्या वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ द्वार दर्शन 10 जानेवारी ते 19 जानेरीपर्यंत आहे. मृत व्यक्तीमधील एकाची ओखळ मल्लिकाच्या रुपात झाली आहे.
टोकन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होत चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. यामध्ये 16 जण जखमी झाले असून त्यांना रुइया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता येईल. घटनेवेळी पोलीस घटनास्थळीच होते पण गर्दीवर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही.
मंदिराच्या तिकीट काउंटवर चेंगराचेंगरी झाल्यानंतर काहींना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती देत म्हटले की, काउंटवर टोकन घेताना जवळजवळ 60 जण एकमेकांवर पडले गेले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. काही भाविकांनी असा आरोप लावलाय की, पोलिसांनी बेशिस्तपणा केला. दुसऱ्या बाजूला तिरुमाला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी ही घटना कोणताही कट असल्याच्या गोष्टीला नकार दिला आहे. नायडू यांनी म्हटले की, चेंगराचेंगरीची घटना ही केवळ एक दुर्घटना होती.
आणखी वाचा :
तिरुपति मंदिरात दुर्घटना: वैकुंठ द्वार दर्शनासाठी गर्दी, ६ ठार