जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सोमवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे कुलगामच्या रेडवानी पायन भागात तीन दहशतवादी दिसल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे.

Ankita Kothare | Published : May 7, 2024 11:03 AM IST

नॅशनल डेस्क : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सोमवारी रात्रीपासून येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. मंगळवारी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. कुलगाममधील रेडवानी पाइन भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती सुमारे 12 तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. दहशतवादी कुठे राहतात आणि ते कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी सध्या शोधमोहीम सुरू आहे.

लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बासित अहमद डार ठार :

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बासित अहमद डार मारला गेला आहे. त्याच्यासोबत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख लवकरच होईल. सध्या दोन्ही बाजूने गोळीबार सुरु आहे.

दहशतवाद्यांना घेराव घालत जवानांनी केला गोळीबार :

सुरक्षा दलांना दहशतवाद्यांची माहिती मिळताच ते तातडीने सक्रिय झाले. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी त्या ठिकाणाला वेढा घातला होता. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही जबाबदारी स्वीकारून प्रत्युत्तर दिले. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बासित अहमद डार मारला गेला. यानंतर दोन दहशतवादी आणि जवान गोळ्यांना बळी पडले.

4 मे रोजी झाला होता हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला :

जम्मू-काश्मीरमध्ये 4 मे रोजी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी या ताफ्यावर गुप्तपणे गोळीबार केला होता. या घटनेत एक जवानही शहीद झाला आहे. त्यानंतर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर अत्यंत सतर्क झाले होते. या कारवाईत तीन दहशतवादी जवान ठार झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा हल्ला शनिवारी संध्याकाळी झाला जेव्हा हवाई दलाचा ताफा सुरनकोट परीसरातून सनाई टॉपकडे जात होता. या हल्ल्यासाठी जबाबदार दहतवाद्यांचा शोध घेणअयासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर झालेला हा वर्षातील दुसरा हल्ला आहे. जानेवारी मध्ये सेनेच्या ताफ्यावर कथित दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.

Share this article