दिल्ली मेट्रोमधील होळीचा उत्सव व्हायरल, सोशल मीडियावर वादाला फुटले तोंड

जसजशी होळी जवळ येत चालली आहे तस तसे त्याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

vivek panmand | Published : Mar 23, 2024 12:36 PM IST / Updated: Mar 23 2024, 06:21 PM IST

जसजशी होळी जवळ येत चालली आहे तस तसे त्याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये आता अनेक जण व्हिडीओ काढत असून सोशल मीडियावर ते पटकन लोकप्रिय होत आहेत. दोन महिलांची असणारी ही व्हिडीओ खूपच वादात सापडल्याचे दिसून आले आहे. 

या दोन महिला मेट्रोमध्ये बसल्याचे आपल्याला दिसून येते. त्या एकमेकींना रंग लावत असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या दोघीही रंगामध्ये बसलेल्या असून रंग लगा दे रे या गाण्यावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ नंतर पाहणाऱ्या व्यक्तीला पाहायची इच्छा होत नाही. 

कारण त्या दोन मुली एकमेकींच्या गालावर गाळ चोळायला सुरुवात करतात. एकमेकांच्या जवळ येऊन चुंबन घेऊ लागतात आणि एकमेकांवर झोपण्याचे नाटक करतात. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रेक्षकांनी दिल्ली मेट्रोने या दोन मुलींच्या विरोधात तक्रार करावी अशी मागणी केली आहे. यावर लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक म्हणत आहेत की, "हा व्हिडिओ पाहून मला लाज वाटते! तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांची फक्त कल्पना करून पहा. अशा प्रकारच्या कमेंटने लोकांनी त्यांची टर उडवली आहे. 
आणखी वाचा  - 
दारू धोरण प्रकरणात निवडणूक देणग्यांचा खेळ, 'आपने’ केला भाजपवर हल्लाबोल, 'सरकारी साक्षीदाराने केंद्र सरकारला निवडणूक रोख्यांतर्गत दिले 59 कोटी रुपये
पैसे कमवण्यासाठी होळीच्या रंगात मार्बल स्लरी जाते वापरली, काळजी घ्या नाहीतर चेहरा होईल खराब

Share this article