थायलंडला फिरायला जाणाऱ्या भारतीयांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. आता व्हिसाशिवाय ३० दिवसांपर्यंतच थायलंडमध्ये राहता येईल. पासपोर्ट, रिटर्न तिकीट, हॉटेल बुकिंगसोबतच २०,००० थाई बात रोख रक्कम आणि TDAC कार्ड जवळ असणं बंधनकारक आहे.
थायलंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर १५ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणारे नवीन नियम नक्की जाणून घ्या. भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा-फ्री एन्ट्री सुरूच राहणार आहे, पण आता तुम्ही ६० दिवसांऐवजी फक्त ३० दिवसच तिथे राहू शकाल. त्यामुळे, थायलंडला जाण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रवासाचे नियम तपासणं गरजेचं आहे.
26
३० दिवस थायलंडमध्ये राहता येईल
१५ सप्टेंबरपासून पर्यटनासाठी थायलंडला जाणाऱ्या भारतीय पासपोर्टधारकांना टुरिस्ट व्हिसा घेण्याची गरज नाही. पण, या व्हिसा-फ्री सुविधेअंतर्गत तुम्हाला फक्त ३० दिवसच थायलंडमध्ये राहता येईल. आधी ही मुदत ६० दिवसांची होती, जी आता कमी करून ३० दिवस करण्यात आली आहे. म्हणजे, व्हिसा-फ्री एन्ट्री रद्द झालेली नाही, फक्त तिथे राहण्याचा कालावधी बदलला आहे.
36
पासपोर्टची मुदत
थायलंडला जाणाऱ्या प्रवाशांच्या पासपोर्टची वैधता, देशात प्रवेश करण्याच्या तारखेपासून किमान सहा महिने असणं आवश्यक आहे. जर तुमच्या पासपोर्टची मुदत संपत आली असेल, तर प्रवासाला निघण्यापूर्वीच तो रिन्यू करून घ्या.
व्हिसा-फ्री सुविधेचा वापर करून थायलंडला जाणाऱ्या प्रवाशांकडे कन्फर्म रिटर्न तिकीट असणं बंधनकारक आहे. फक्त वन-वे तिकीट काढून नंतर रिटर्नचं बघू, असा विचार करू नका. इमिग्रेशनवेळी विचारल्यास दाखवण्यासाठी रिटर्न तिकीट तयार ठेवा. याचसोबत, हॉटेल किंवा राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग कन्फर्म करून घ्या. कुठे-कुठे फिरणार आहात, याचा एक छोटा प्लॅनही तयार ठेवा. हॉटेल बुकिंगची कॉपी फोनमध्ये सेव्ह करून ठेवा.
56
डिजिटल अरायव्हल कार्ड
व्हिसा-फ्री एन्ट्रीचा फायदा घेणाऱ्या पर्यटकांना त्यांची आर्थिक क्षमताही सिद्ध करावी लागेल. प्रत्येक प्रवाशाकडे किमान २०,००० थाई बात (अंदाजे ५८,००० रुपये) रोख रक्कम असणं आवश्यक आहे. त्यामुळे, फक्त क्रेडिट कार्ड किंवा डिजिटल पेमेंटवर अवलंबून न राहता, पुरेशी रोकड सोबत ठेवा. तसेच, थायलंडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 'थायलंड डिजिटल अरायव्हल कार्ड' (TDAC) भरणं विसरू नका. तुम्ही थायलंडमध्ये पोहोचण्याच्या ७२ तास आधी हे कार्ड ऑनलाइन भरू शकता.
66
सर्व गोष्टींची तयारी आधीच करा
जर थायलंड तुमचं अंतिम ठिकाण नसेल आणि तुम्ही फक्त काही वेळासाठी तिथे थांबणार असाल (ट्रान्झिट), तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला ज्या देशात जायचं आहे, त्या देशाचा व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रं तुमच्याकडे तयार पाहिजेत. थायलंडमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री आहे, म्हणून पुढच्या देशाचे नियम तुम्हाला लागू होणार नाहीत, असं समजू नका. त्यामुळे, १५ सप्टेंबरनंतर थायलंडला जाण्याचं नियोजन करत असाल, तर व्हिसा लागत नाही म्हणून गाफील न राहता पासपोर्टची वैधता, रिटर्न तिकीट, हॉटेल बुकिंग, रोकड आणि TDAC या सगळ्या गोष्टींची तयारी आधीच करून ठेवा.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.