गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची हत्या, वडिलांनीच पोरीचा घेतला जीव

Published : Jul 10, 2025, 07:37 PM IST
tennis player radhika yadav

सार

गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळी मारून हत्या केली. सुशांत लोक येथील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असून वडिलांना ताब्यात घेतले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे राधिकाच्या वडिलांनीच तिच्यावर गोळी झाडली होती. ही घटना गुरुग्राम येथील सुशांत लोक-२ तेथे त्यांच्या निवासस्थानी एक दुर्घटना घडली असून तिच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला असून तिला गोळी का मारली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

नेमकं काय घडलं?

राधिका आणि तिचे वडील एकाच घरात राहत होते. सुशांत लोक येथील राहत्या घरात वडिलांनी गोळी घातल्यानंतर राधिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या राधिकाला हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमागील कारण समोर आले नसून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वडिलांनी झाडल्या तीन गोळ्या 

वडिलांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या होत्या, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. गुरुग्राम येथील सेक्टर ५७ या तिच्या राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या. गुरुग्राम पोलिसांनी तिला अटक करून नंतर घटनास्थळावरून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. त्या दोघांमध्ये गोळी झाडण्याचा आधी वाद झाला होता, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

नेमकं कारण काय होतं? 

राधिका ही टेनिस खेळातील उत्कृष्ट खेळाडू होती. ती राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती आणि त्यामध्ये तिने पारितोषिक जिंकले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये रील बनवण्यावरून वाद झाला होता. तो वाद एवढ्या टोकाला जाऊन पोहचला की तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून आपल्याच मुलीचा जीव घेतला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!