टीसीएस (TCS) कंपनीत नोकरी मिळवायची असेल, तर आता फक्त जुने स्किल्स चालणार नाहीत. कंपनीच्या नव्या भरतीत ८० टक्के उमेदवारांकडे डिजिटल आणि नेक्स्ट-जेन टेक्नॉलॉजीचे स्किल्स असणं गरजेचं आहे. फक्त ChatGPT येऊन चालणार नाही, तर आणखी काय हवंय?
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वेग खूप वाढलाय. त्यामुळे आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना कोणते स्किल्स शिकावेत, असा प्रश्न पडतो. अनेकांना वाटतं की फक्त ChatGPT सारखे टूल्स वापरता आले की नोकरी मिळेल. पण खरंच तसं आहे का?
भारतातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आता नोकरभरती करताना डिजिटल आणि नेक्स्ट-जेन टेक्नॉलॉजी स्किल्सला सर्वाधिक महत्त्व देणार आहे.
कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) आरती सुब्रमण्यम यांनी सांगितलं की, भविष्यात भरती होणाऱ्या ८० टक्के कर्मचाऱ्यांकडे हे स्किल्स असतील. याचा अर्थ फक्त AI टूल्स वापरता येणं पुरेसं नाही, तर कामाच्या ठिकाणी त्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, हे तुम्हाला समजलं पाहिजे.
24
८०% उमेदवारांकडे कोणते स्किल्स हवेत? TCS काय म्हणतंय?
टीसीएसने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत सुमारे ४,५०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. आरती सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी २५ ते ३० टक्के उमेदवारांकडे विशेष आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्किल्स होते. तर एकूण भरती झालेल्यांपैकी जवळपास ८० टक्के लोकांकडे नेक्स्ट-जेन टेक्नॉलॉजीचे स्किल्स होते. कंपनी पुढेही याच पद्धतीने भरती करणार आहे.
इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. ८० टक्के म्हणजे सगळेच AI तज्ज्ञ नाहीत. यात डिजिटल आणि नव्या पिढीचे तंत्रज्ञान जाणणारे लोक आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्के लोकांकडे विशेष AI स्किल्स होते.
एआयवर आधारित कामं वाढत असल्यामुळे, तांत्रिक ज्ञान, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची क्षमता या गोष्टींना महत्त्व आलंय. पण टीसीएसने दिलेली ही माहिती म्हणजे एखादा विशिष्ट कोर्स केला की नोकरी मिळेलच, याची गॅरंटी नाही.
34
अनुभवी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत का?
एआय तंत्रज्ञान वेगाने वाढत असताना, फक्त फ्रेशर्सनाच जास्त संधी मिळेल का, असा प्रश्न पडू शकतो. नवीन टूल्स लवकर शिकण्याची क्षमता तरुण कर्मचाऱ्यांच्या फायद्याची ठरते. पण अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी नाही, असं टीसीएसने अजिबात म्हटलेलं नाही.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतीवासन यांनी स्पष्ट केलंय की, जे अनुभवी लोक नवीन तंत्रज्ञान शिकायला आणि जुन्या पद्धती बदलायला तयार आहेत, त्यांच्यासाठी उत्तम संधी आहेत.
याचं कारण म्हणजे, अनुभवी लोकांना फक्त तंत्रज्ञानच नाही, तर त्या क्षेत्रातील कामकाज, ग्राहकांच्या गरजा आणि व्यवसायातील अडचणी यांची चांगली जाण असते. या ज्ञानाला जर त्यांनी एआय स्किल्सची जोड दिली, तर ते तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यात आघाडीवर राहू शकतात.
त्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांनी फक्त जुन्या स्किल्सवर अवलंबून न राहता आपल्या क्षेत्रातील ज्ञानासोबत नवीन तंत्रज्ञान शिकणं गरजेचं आहे.
टीसीएसच्या या नोकरभरतीच्या पद्धतीवरून नोकरी शोधणाऱ्यांना एक महत्त्वाचा संदेश मिळतो. एआय टूल्स वापरता येणं ही फक्त सुरुवात आहे; पण त्याचा वापर करून कामाच्या ठिकाणचे खरे प्रॉब्लेम्स सोडवता येणं जास्त महत्त्वाचं आहे.
नोकरी शोधणाऱ्यांनी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं:
AI टूल्स वापरायला शिका: ChatGPT सारख्या टूल्सच्या मदतीने डेटा ॲनालिसिस आणि कामं सोपी करण्याची प्रॅक्टिस करा.
बेसिक तांत्रिक ज्ञान वाढवा: तुमच्या आवडीनुसार प्रोग्रामिंग, डेटा ॲनालिटिक्स किंवा मशीन लर्निंग यांसारखे स्किल्स शिका.
प्रॅक्टिकल अनुभव घ्या: शिकलेल्या गोष्टी छोट्या प्रोजेक्ट्समध्ये वापरून पाहा. एआयने दिलेले रिझल्ट्स तपासायला शिका.
डोमेन नॉलेज वाढवा: तुम्ही ज्या क्षेत्रात काम करू इच्छिता (उदा. फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग), तिथल्या गरजा समजून घ्या.
सतत शिकत राहा: तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे स्वतःला अपडेट ठेवा.
सप्टेंबर २०२६ च्या तिमाहीत टीसीएसच्या एकूण महसुलात एआय आधारित कामांचा वाटा सुमारे १० टक्के होता. यावरून कंपनीचा एआय बिझनेस किती वेगाने वाढतोय, हे दिसून येतं.
पण याचा अर्थ असा नाही की एखादा एआय कोर्स केला म्हणजे नोकरी पक्की. तांत्रिक ज्ञान, प्रॅक्टिकल अनुभव, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता आणि सतत शिकण्याची तयारी तुम्हाला नोकरी मिळवून देईल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.