तमिळनाडूत विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रुग्णालयात दाखल

Tamil Nadu News : तमिळनाडू विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय 60 हून अधिक जणांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chanda Mandavkar | Published : Jun 20, 2024 5:01 AM IST / Updated: Jun 20 2024, 10:32 AM IST

Tamil Nadu News : तमिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात कथित रुपात अवैध देसी दारुच प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कल्लाकुरिची जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात सुरु असणाऱ्या रुग्णांची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (CM M.K. Stalin) यांनी मृत व्यक्तींसाठी शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले की, "कल्लाकुरिची येथे बनावटी दारु प्यायल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने धक्का बसला आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सदर घटना रोखण्यासाठी अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही कार्यवाही केली आहे."

दारुत मिथेनॉलचा समावेश
प्रकरणात 49 वर्षीय अवैध दारु विक्रेता के. कन्नुकुट्टीला अटक करण्यात आली आहे. याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 200 लीटर अवैध दारुची चाचणी केली. चाचणीमध्ये दारुत मिथेनॉल असल्याचे असल्याचे समोर आले. या घटनेचा अधिक तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सीबी-सीआयडीला दिले आहेत. सरकारने घटनेनंतर कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी श्रवण कुमार जाताथ यांची बदली केली आहे. याशिवाय पोलीस अधिक्षक समय सिंह मीणा यांच्यासह अन्य 9 जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

राज्यपालांनी व्यक्त केले दु:ख
तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवि यांनी मृत व्यक्तींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. राजभवनाच्या अधिकृत सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत म्हटले की, "कल्लाकुरिची येथे अवैध दारु प्यायल्याने झालेल्या व्यक्तींच्या निधनाने दु:ख होत आहे. आणखी काहीजण गंभीर अवस्थेत आहेत. मृत व्यक्तींच्या कुटूंबाच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. याशिवाय रुग्णालयातील अन्य जण देखील लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."

आणखी वाचा : 

अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगातच, न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा तर 1 जवान जखमी

Share this article