स्वाती मालिवाल केसमधील प्रमुख आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर स्वाती यांनी मारहाण केल्याचे आरोप केले आहेत.
आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बीभव कुमार यांना अटक केली आहे. पोलिसांनी बीभव यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. आधी ते दिल्लीबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती पण नंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती समजल्यानंतर तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. बीभव यांना सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून तेथे जाऊन त्यांची चौकशी केली जाणार आहे.
बीभवच्या ईमेलचा आयपी ऍड्रेस करण्यात आला ट्रॅक -
बीभव कुमार यांचा दिल्ली पोलीस कसोशीने तपास करत होते. सुरुवातीला ते बाहेर असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना समजली होती पण नंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन बीभव कुमार यांना अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर सिव्हिल लाईन्स येथील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. येथे आपच्या लीगल सेलचे प्रमुख पोहचले होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विभवने ज्या मेल आयडीवरून पोलिसांना मेल केला होता तो ट्रॅक करण्यात आला.
बीभव यांच्याविरोधात दाखल झाली होती तक्रार -
बीभव कुमार यांच्याविरोधात आधी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर बीभव यांचे लोकेशन ट्रेस केले जात होते. त्यांच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या होत्या, पण अखेर त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावरूनच अटक करण्यात आली. स्वाती यांनी बीभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचे आरोप केले होते. त्यांची मेडिकल तपासणी झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.
आणखी वाचा -
'भाजप आता स्वयंपूर्ण आहे, आधी RSS ची गरज पडायची!', जे. पी. नड्डांचं मोठं वक्तव्य
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांचा मुख्यमंत्री हाऊसमधील व्हिडीओ झाला व्हायरल, कॅमेऱ्यात काय आले समोर?