
Mumbai : अपघातावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याची कमाई किंवा सॅलरीनुसार त्याला नुकसान भरपाई किती द्यावी हे ठरविले जाते. पण गृहिणींसंदर्भात हे प्रकरण अधिक किचकट होऊन जाते. कारण गृहिणींना विशिष्ट अशी सॅलरी ठरवली जात नाही. अशातच सुप्रीम कोर्टाने गृहिणींसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टाने म्हटले की, ज्यावेळी एखाद्या दुर्घटनेत गृहिणीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नुकसान भरपाईचे आकलन करणे आवश्यक आहे. याशिवाय गृहिणींचे योगदान केवळ परिवारापर्यंत मर्यादित नव्हे तर मानव संसाधन आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी देखील महत्वाचे असते. अशातच गृहिणींना “नेशन बिल्डर” असेही म्हटले पाहिजे.
एका रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीला अतिरिक्त नुकसान भरपाई मिळावी यासंदर्भात आदेश देत हा निर्णय घेतला आहे. तर सुप्रीम कोर्टाने गृहिणींसाठी कमीत कमी वेतन ३० हजार रुपये ठरविली आहे.
The Supreme Court recognised homemakers as nation builders and held that the loss of domestic-care services must be treated as a distinct head of compensation. The Court fixed a notional monthly income of ₹30,000 for assessing such loss.
A bench of Justices Sanjay Karol and N.… pic.twitter.com/o2mz9MVm1Z— ANI (@ANI) June 11, 2026
गृहिणींचे घरकार्य सुप्रीम कोर्टाचे जस्टिस संजय करोल आणि जस्टिस एन. कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, गृहिणी कोणत्याही सॅलरीशिवाय परिवार आणि समाजासाठी मोठे योगदान देते. त्यांचे काम हे एखाद्या नोकरीपेक्षा कमी नाही. कोर्टाने असेही म्हटले की, त्यांनी गृहिणींसंदर्भात जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांवर सर्व कोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी लक्ष ठेवावे. याशिवाय घरात काम करणाऱ्या महिलेच्या कामाची देखील किंमत असते. यामुळे त्यांचे हे योगदान परिवाराकडून हिरावून घेतले जात असल्यास त्यांना वेगळ्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी.