अनेक वर्षांपासून भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधाराची धुरा सांभाळणारा सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या ऑलिम्पिक पात्रात फेरीत अ गटात भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय फुटबॉल आयकॉन सुनील छेत्रीने गुरुवारी 6 जून रोजी कोलकाता येथे कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने त्याच्या दोन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधाराची धुरा सांभाळणारा सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या ऑलिम्पिक पात्रात फेरीत अ गटात भारत सध्या आघाडीवर असलेल्या कतारपेक्षा चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सुनील छेत्रीचे 2005 साली पदार्पण :
2005 मध्ये पदार्पण करणाऱ्या छेत्रीने देशासाठी 94 गोल केले आहेत. तो भारताचा सर्वकालीन सर्वोच्च स्कोअरर आणि सर्वाधिक कॅप्ड खेळाडू म्हणून निवृत्त होईल. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीनंतर सक्रिय खेळाडूंमध्ये गोल करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सुनील छेत्रीने ताज्या केल्या पहिल्या सामन्याच्या आठवणी :
निवृत्तीची घोषणा करताना सुनीलने पहिल्या सामन्याच्या आठवणी ताज्या करत किस्सा सांगितलं, म्हणाला " मला आठवते मी जेव्हा पहिल्यांदा देशासाठी खेळलो होतो. हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. सकाळी भारतीय संघाचे पहिले प्रशिक्षक सुखी सर (सुखविंदर सिंग) माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू खेळत आहेस. मी माझी जर्सी घेतली आणि त्यावर परफ्यूम फवारला. का माहीत नाही. त्या दिवशी जे काही घडले ते न्याहारीपासून दुपारच्या जेवणापर्यंत, माझा पहिला गोल आणि 80व्या मिनिटाला झालेला गोल मी कधीच विसरणार नाही आणि तो दिवस माझ्या राष्ट्रीय संघासोबतच्या प्रवासातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक होता.
भारतीय फुटबॉलच्या भवितव्याबाबत काय बोला सुनील छेत्री :
भारतीय फुटबॉलच्या भवितव्याबाबत ते म्हणाले की, आता देशाला नऊ क्रमांकाच्या जर्सीसाठी पुढचा खेळाडू निवडावा लागेल. संघात सध्या आपल्या क्लबसाठी मुख्य स्ट्रायकर म्हणून खेळणाऱ्या स्ट्रायकरची कमतरता आहे, असे त्याचे मत आहे. छेत्री म्हणाला की नुकतेच मला जाणवले की प्रवास संपवण्याची वेळ आली आहे. ते म्हणाले गेल्या 19 वर्षांत मला कर्तव्य, दबाव आणि आनंद जाणवला.
सुनील छेत्रीच्या नेतृत्वात जिंकलेले चषक :
नेहरू चषक (2007, 2009, 2012), दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAF) चॅम्पियनशिप (2011, 2015, 2021) मध्ये भारताच्या विजेतेपदांचा शिल्पकार छेत्री होता. 2008 AFC चॅलेंज चषक जिंकण्यातही त्याचा मोलाचा वाटा होता, ज्यामुळे भारताला 27 वर्षात प्रथमच AFC आशियाई कप (2011) खेळण्याची संधी मिळाली.