Lok Sabha Election 2024 : पुरी लोकसभेत सुचरिता मोहंती यांनी नाकारली काँग्रेसची उमेदवारी ; केले हे आरोप

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना हाय-प्रोफाइल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.काँग्रेसकडून जय नारायण पटनायक यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

Ankita Kothare | Published : May 5, 2024 3:06 AM IST

काँग्रेसने शनिवारी रात्री जय नारायण पटनायक यांना ओडिसातील पुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. सुचरिता मोहंती यांच्या जागी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जय नारायण पटनायक यांना उमेदवारी दिल्याचे काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे. खरे तर ओडिसातील पुरी येथील काँग्रेसच्या पूर्व उमेदवार सुचरिता मोहंती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून निधी मिळत नसल्याचा सुचरिता यांनी आरोप करत उमेदवारी नाकारली होती.त्या म्हणाल्या की, पुरीतील विजयी मोहिमेपासून केवळ निधीअभावी आम्हाला थांबवले जात आहे. पक्षाच्या निधीशिवाय पुरीमध्ये प्रचार करणे शक्य होणार नाही याचे मला दुःख आहे. त्यामुळे मी पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट परत करत आहे.

सुचरिता यांच्या राजनाम्यात काय ?

सुचरिता मोहंती यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, "मी काँग्रेस महिला कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसची मूलभूत मूल्ये माझ्या रक्तात आहेत.त्यामुळे उमेदवारी नाकारत जरी असले तरी,मी काँग्रेस आणि जननायक राहुल गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहीन.

पुरीमध्ये हाय प्रोफाइल निवडणूक :

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत हाय प्रोफाइल झाले आहे. 

क्राउड फंडिंगद्वारे निधी जमा करण्याचा प्रयत्न :

पुरी लोकसभा जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर मोहंती यांनी क्राउड फंडिंगद्वारे निधीची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न केला होता. निवडणूक लढवण्यासाठी देणग्या मागताना त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर UPI QR कोड आणि खात्याचे इतर तपशीलही शेअर केले होते.

2014 मध्ये पिनाकी मिश्रा यांच्याकडून पराभव :

मोहंती यांनी पुरी लोकसभा मतदारसंघातून 2014 ची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना बीजेडीचे उमेदवार पिनाकी मिश्रा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

आणखी वाचा :

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर पूंछमध्ये हल्ला ; एक जवान उपचारादरम्यान शहिद

राहुल गांधींच्या रायबरेलीमधून उमेदवारी भरल्यावर वायनाडच्या मतदारांनी कशी प्रतिक्रिया दिली?

 

Read more Articles on
Share this article