Sridhar Vembu : 'मेक इन इंडिया'चा नारा सध्या खूप ऐकू येतोय. हे फक्त वस्तूंच्या निर्मितीपुरतं मर्यादित न राहता सॉफ्टवेअर क्षेत्रातही पसरत आहे. यामध्ये झोहो (Zoho) आघाडीवर आहे. या कंपनीच्या सीईओंबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
श्रीधर वेंबू झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत. अमेरिकेतील लाखोंचे पॅकेज सोडून ते भारतात परतले. ग्रामीण भारतातून त्यांनी जागतिक दर्जाची सॉफ्टवेअर कंपनी यशस्वीपणे उभारली. सध्या 'अरट्टाई' ॲपमुळे ते देशाचे लक्ष वेधून घेत आहेत.
25
शिक्षण आणि करिअर
प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर श्रीधर यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये करिअर सुरू केले. मोठी स्वप्नं फक्त मोठ्या शहरांतच पूर्ण होतात, यावर त्यांचा विश्वास नव्हता. लहान गावांमधील प्रतिभा ओळखून जागतिक कंपनी उभारण्याची त्यांची कल्पना होती.
35
अशी झाली सुरुवात...
2000 साली श्रीधर अमेरिकेतून भारतात परतले. त्यांनी तामिळनाडूतील गावातून AdventNet Inc. नावाने कंपनी सुरू केली, जी पुढे Zoho Corporation झाली. विशेष म्हणजे, कोणत्याही बाहेरील गुंतवणुकीशिवाय कंपनीने स्वतःच्या कमाईतून सुरु केली.
श्रीधर यांनी नोकरभरतीसाठी अनोखी पद्धत वापरली. त्यांनी फक्त इंजिनिअर्सनाच नाही, तर स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकवले. यामुळे ग्रामीण भागातूनही जागतिक दर्जाची प्रतिभा समोर आली.
55
ग्लोबल सॉफ्टवेअर लीडर
आज झोहो 50 पेक्षा जास्त क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर उत्पादने देते. 180 हून अधिक देशांमध्ये 100 दशलक्षाहून अधिक युजर्स आहेत. ईमेल, CRM, एचआर मॅनेजमेंट अशा सर्व क्षेत्रांत झोहोची टूल्स उपलब्ध आहेत. त्यांचे हे मॉडेल तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.