काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी 'एक्स' (X) वर अधिकृत अकाऊंट सुरू केलं आहे. आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतची पहिली भेट आणि त्यांच्या प्रेमकहाणीचा उलगडा केला आहे.
सोनिया गांधींचे 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होत आहे. या निमित्ताने त्यांनी राजीव गांधींसोबतच्या आठवणी सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला. शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना तिथलं जेवण त्यांना आवडायचं नाही. इटालियन जेवणाच्या शोधात असताना त्यांना केंब्रिजमध्ये एक छोटं ग्रीक रेस्टॉरंट सापडलं. 'व्हर्सिटी रेस्टॉरंट' नावाच्या या हॉटेलमध्ये युरोप आणि भारतातले विद्यार्थी यायचे. तिथेच एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची राजीव गांधींशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत राजीव आपले जोडीदार असावेत, असं सोनिया गांधींना वाटलं. राजीव गांधींच्या मनातही तीच भावना होती, हे त्यांना नंतर समजलं.
25
रूपापेक्षा स्वभावानेच जास्त भुरळ घातली
राजीव गांधींसोबतची ओळख आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली, असं सोनिया गांधींनी सांगितलं. राजीव दिसायला देखणे होतेच, पण त्यांच्या साधेपणाने आणि नम्रतेने सोनियांचे मन जिंकले. पहिल्या भेटीची ती भावना आजही आपल्या लक्षात असल्याचं त्यांनी भावुक होत सांगितलं.
त्या काळात राजीव यांच्यासोबत डिनर, ट्रिप्स आणि विद्यार्थ्यांच्या मीटिंग्सना त्या जायच्या. त्यांनी एकत्र व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा केला होता. प्रेम, हास्य आणि अनेक गोड आठवणींनी आपण आपलं एक वेगळं जग निर्माण केलं होतं, असं सोनिया गांधींनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
In a small Greek restaurant in Cambridge my journey of love began.
Rajiv and I created a world filled with love, laughter and memories. On 10th November, I share that world with you. https://t.co/zvN5Rqqstf
— Sonia Gandhi (@SoniaGandhi) October 24, 2026
35
१० नोव्हेंबरला आत्मचरित्र होणार प्रकाशित
सोनिया गांधींनी लिहिलेले 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक १० नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीव गांधींसोबतच्या नात्यावर भाष्य करणारा व्हिडीओ शेअर केला. या पुस्तकातून त्या आपल्या प्रेमाच्या आठवणी वाचकांसमोर मांडणार आहेत. 'एक्स'वरील पहिल्याच पोस्टमध्ये त्यांनी केंब्रिजमधल्या त्या छोट्या ग्रीक रेस्टॉरंटचा उल्लेख केला. राजीव यांच्यासोबत घालवलेले दिवस आयुष्यात खूप खास आहेत आणि १० नोव्हेंबरला या आठवणींचं जग आपण वाचकांसोबत शेअर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं. आता त्यांनी 'एक्स'वरही आपलं अकाऊंट सुरू केलं आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच पोस्टसाठी त्यांनी राजकीय विषय न निवडता आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी राजीव गांधींसोबतचे जुने फोटोही दाखवले आहेत. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी आपले वैयक्तिक अनुभव शेअर केल्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
55
सोनिया-राजीव यांच्या प्रेमकहाणीवर पवन खेरा यांची प्रतिक्रिया
सोनिया गांधींच्या 'एक्स'वरील पदार्पणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली. राजीव आणि सोनिया यांच्या प्रवासात प्रेम आणि निष्ठेसोबतच अनेक दुःखी प्रसंगही आल्याचं त्यांनी म्हटलं. खेरा यांनी या प्रेमकहाणीची तुलना उन्हाळ्याच्या रात्री पडलेल्या एका सुंदर स्वप्नाशी केली. एका भयंकर शोकांतिकेने हे स्वप्नांचं जग उद्ध्वस्त करेपर्यंत त्यांचा हा प्रवास अतिशय सुंदर होता, असं ते म्हणाले. सोनिया गांधींनी शेअर केलेल्या या आठवणी आणि त्यांचं आगामी आत्मचरित्र सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.