भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील बांद्रा गरीब नगर येथील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. रेल्वे ट्रॅकजवळील बेकायदा झोपड्या हटवल्यानंतर बांद्रा टर्मिनस विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक आयोग भेटीवर टीका करत बनावट मतदारांच्या मुद्द्यावरही मोठं वक्तव्य केलं.