राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.