भारतात रेल्वे म्हणजे सरकारी मालमत्ता, हेच आपण आजवर पाहत आलोय. पण देशात एक अशीही रेल्वे लाईन आहे, जी आजही खाजगी मालकीची आहे. ही रेल्वे लाईन कोणती आणि ती अजूनही खाजगी का आहे? जाणून घेऊया.
शकुंतला रेल्वेचा इतिहास १९१० मध्ये सुरू झाला. किलिक-निक्सन (Killick-Nixon) या ब्रिटिश कंपनीने ही रेल्वे लाईन टाकली. यासाठी सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) स्थापन केली गेली. महाराष्ट्रातील विदर्भात पिकणारा कापूस रेल्वेने थेट इंग्लंडमधील मँचेस्टरला पाठवणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. १९१६ मध्ये या ट्रॅकवर पहिली रेल्वे धावली. सुरुवातीला फक्त कापूस वाहून नेणारी ही रेल्वे नंतर प्रवाशांसाठीही सुरू झाली.
25
चालवण्याची जबाबदारी भारतीय रेल्वेची
१९५२ मध्ये भारत सरकारने देशभरातील रेल्वेचे राष्ट्रीयीकरण केले. अनेक खाजगी रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेत विलीन झाले. पण शकुंतला रेल्वे लाईन मात्र खाजगीच राहिली. आजही या रेल्वे लाईनची मालकी सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीकडे (CPRC) आहे. ट्रॅक खाजगी कंपनीचा असला तरी, त्यावर ट्रेन चालवण्याची जबाबदारी मात्र भारतीय रेल्वे पार पाडते.
35
ट्रॅकची देखभाल CPRC कडून होते
१९२१ मध्ये मँचेस्टरमध्ये बनलेले ZD वाफेचे इंजिन १९२३ पासून या मार्गावर धावू लागले. तब्बल ७० वर्षे या इंजिनने सेवा दिली. १५ एप्रिल १९९४ रोजी वाफेच्या इंजिनची जागा डिझेल इंजिनने घेतली. पूर्वी ही ट्रेन स्टेशनवर तर थांबायचीच, पण प्रवाशांनी हात दाखवला की तिथेही थांबायची. सध्या हा मार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत येतो. रेल्वे चालवणे सरकारचे काम, तर ट्रॅकची देखभाल CPRC करते. हा करार दर १० वर्षांनी रिन्यू होतो.
महाराष्ट्रातील मूर्तिजापूरवरून ही रेल्वे दोन दिशांना जाते. मूर्तिजापूर ते यवतमाळ ११३ किमी आणि मूर्तिजापूर ते अचलपूर ७६ किमी, असा एकूण १९० किमीचा हा नॅरो गेज मार्ग आहे. या मार्गावर दिवसातून फक्त एकच फेरी व्हायची. २० किमी प्रति तास वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला पूर्ण प्रवासासाठी २० तास लागायचे. बसने यवतमाळला जायला १५० रुपये लागतात, पण ट्रेनचे तिकीट त्याच्या सहाव्या हिश्श्याइतकेच होते. त्यामुळे गरिबांसाठी ही ट्रेन खूप महत्त्वाची होती.
55
१५०० कोटींचा निधी मंजूर
काळानुसार रेल्वे बदलत आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरो गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी १,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, कामाला सुरुवातही झाली आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.