हरीश साळवे यांच्यासह 500 हून अधिक वकीलांचे सरन्यायाधीशांना पत्र, विशिष्ट गटाकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकल्याचा केलाय आरोप

राजकीय व्यक्ती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात एक ग्रुप न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर दबाव टाकत असल्याचा आरोप 500 हून अधिक वकीलांनी केला आहे. या संदर्भातील पत्र सरन्यायाधीशांना पाठवण्यात आले आहे.

Judiciary Under Threat From Political Pressure : जेष्ठ वकील हरीश साळवे (Harish Salve) यांच्यासह देशभरातील 500 हून अधिक न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यावरून चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय पत्रात म्हटलेय की, एक ग्रुप न्यायव्यवस्थेच्या निर्णयांना प्रभावित करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. खासकरून राजकीय व्यक्ती आणि भ्रष्टाचारासंबंधित प्रकरणात असे अधिक पाहायला मिळत आहे.

वकीलांनी पत्रात नक्की काय म्हटलेय?
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेय की, खास समूहाकडून वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकला जात आहे. यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलील होत आहे. खरंतर, हे खास समूह अशी विधाने करतात जी योग्य नाहीत आणि राजयकीय स्वरुपात त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वकाही केले जाते. राजकीय व्यक्ती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना वकीलांनी लिहिलेल्या पत्रात हरीश साळवे, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी आणि देशभरातील 500 हून अधिक वकीलांचा समावेश आहे.

पत्रात आणखी काय म्हटलेय? 
 दरम्यान, वकीलांनी सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात असेही म्हटलेय की, या खास ग्रुपकडून काही प्रकारे न्यायव्यस्थेचे कामकाज प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये न्यायव्यवस्थेबद्दलच्या चुकीच्या गोष्टी पसरवणे ते कोर्टातील कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती करणे आणि कोर्टात नागरिकांचा विश्वास कमी करण्याचे काम केले जाते. याशिवाय खास ग्रुपकडून राजकीय अजेंडाच्या आधारावर कोर्टाच्या निर्णयाचे कौतुक किंवा टीकाही केली जाते.

आणखी वाचा : 

MDMK चे खासदार गणेशमूर्ति यांचे निधन, दोन दिवसांआधी केला होता आत्महत्येचा प्रयत्न

2024 Mood of the Nation Survey: राम मंदिर-डिजिटल इंडिया किंवा इतर, नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश काय?

2024 Mood of the Nation Survey: पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना पहिली पसंती, दुसरा कोण?

Share this article