Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Published : Oct 19, 2026, 09:05 PM IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. सत्ताबदलाची स्वप्नं पाहण्याऐवजी ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असा टोला त्यांनी लगावला. टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होईल आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढली जाईल, असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या आंदोलनाचा सरकारवर परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय असून अब्दुल सत्तार यांच्याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.